Top Post Ad

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्राला महाराष्ट्र शासनाने दाखवली केराची टोपली

२० हजार कोटी बजेट असणाऱ्या महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेसाठी ४०० कोटी निधी नाही? या शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालय/शाळा यासाठी राखीव असतांना देखील हा निधी दिला जात नाही, तर तो इतरत्र वळविला जातो याचा जाब तमाम विद्यार्थी वर्ग  मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे. यासंदर्भात मा.ना. रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांना पत्र लिहुन हा निधी देण्याची वारंवार पत्रव्यवहार करुन विनंती केली आहे. त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे. या विरोधात २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथून दादर चैत्यभूमी पर्यंत सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्याकरिता बाईक रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती रिपाई विद्यार्थी नेते चंद्रशेखर कांबळे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे सचिन बनसोडे, अश्विन वाघ, तसेच प्रशांत मोरे उपस्थित होते.   


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी १९४५ साली पीपल्स् एज्युकेशनची स्थापना केली होती या संस्थेच्या सिध्दार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय आनंदभवन या इमारतीच्या नुतनिकरणासाठी तात्कालिन सामाजिक न्याय मंत्री मा. ना. धनंजय मुंढे यांनी १२ कोटी ४२ लाख रुपये मंजुर करुन काम देखील पुर्ण झाले परंतु इमारतीचे अपुर्ण काम झाल्यामुळे ४२ कोटींचा वाढीव निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्याकडे सादर केला आहे ऊर्वरीत ३२ कोटी देण्यास सरकार दिरंगाई करीत आहे, मंत्रालयाची फाईल कात्रीमध्ये अडकवून अधिकारी पैसे देण्यास विलंब लावीत आहे, कॉन्ट्रॅक्टर काम सोडून निघून गेला आहे, विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे, महाविद्यालयाची लिफ्ट बंद पडली आहे, महाविद्यालयाची डागडुजी न झाल्यामुळे नवीन विद्यार्थी प्रवेश घेण्यास घाबरत आहेत काही विद्यार्थी महाविद्यालय सोडून जात आहेत, महाविद्यालयात विद्यार्थी नसतील तर महाविद्यालय कसे चालेल? महाविद्यालय बंद पाडण्याचा डाव मंत्रालयातले अधिकारी करीत आहेत, यासंदर्भात मा. मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्रव्यवहार करुन कोनशिला बसविण्याची विनंती केली आहे तरी देखील मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही.

सरकार ना-हरकत देत नाही त्यामुळे महाविद्यालयातील रिक्त जागा भरता येत नाही ३१ सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्याची परवाणगी आहे तरी पण सरकार महाविद्यालयास ना-हरकत देत नाही, सिध्दार्थ महाविद्यालयाचे काम बंद असल्यामुळे विद्याथ्यर्थ्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची मदत शासन महाविद्यालयास करीत नाही. सिध्दार्थ विधी महाविद्यालय, फोर्ट, डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा येथे उच्च शिक्षित पीएचडी धारक प्राचार्य असणे बंधनकारक असतांना शासनाने लायब्रेरीयन यांना प्रभारी प्राचार्य पदाची परवाणगी संस्थेला विचारात न घेता परस्पर दिली त्यामुळे बार काऊंसिल कडुन महाविद्यालयाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे, प्राचार्यांच्या भरतीला, शीक्षकांच्या भरतील शासन मान्यता देत नाही त्यामुळे सरकारला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले महाविद्यालये बंद पाडायचे आहेत,

वडाळा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लॅक्ससाठी मुंबई महानगरपालिकने ५ एकर जमीन ९९ वर्षांच्या लिजवर संस्थेला दिली आहे या जमीनीवर डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, क्रिकेटचे मैदान उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाला सादर केला आहे परंतु शासनाचे अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अडवून ठेवला आहे जेणेकरुन ही जागा महानगरपालिका परत घेईल असे षडयंत्र जातीयवादी अधिकारी करीत आहे. वडाळा येथील सिध्दार्थ विहार हॉस्टेलचा प्रस्ताव शशी प्रभू यांनी तयार करुन शासनाला सादर केला हा प्रस्ताव ७८ कोटींचा आहे हा प्रस्ताव देखील सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी धुळखात बाजुला ठेवला आहे.

सी.बी.डी. बेलापूर येथील पीईएस माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मराठी माध्यम या शाळेचा इमारतीच्या डागडुजीचा ८ कोटींचा प्रस्ताव याची फाईल देखील मंत्रालयात अडकून पडली आहे. पंढरपूर येथील संत गाडगे महाराजांनी वसतीगृह व शाळेसाठी जागा दान केली होती या वसतीगृह व शाळेच्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी १५ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे सचिवाने हा प्रस्ताव देखील अडवून ठेवला आहे. महाड येथील सुभेदार सवादकर वसतीगृहाच्या नुतनिकरणासाठी ७ कोटा मंजुर झाले आहेत परसतु सचिवाकडे फाईल अडकून पडली आहे. मुबंई फोर्ट येथील सिध्दार्थ कला, विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय, बुध्दभवन इमारतीच्या डागडुजी करीता १५ कोटींचा निधीची फाईल सादर केली असुन ती शासन दरबारी धुळ खात पडुन आहे. 

डॉ. आंबेडकर वाणिज्य आणि अर्थसास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई इमारतीच्या डागडुजी करीता १५ कोटींचा निधीची फाईल सादर केली असुन ती शासन दरबारी धुळ खात पडुन आहे. येरवडा, पुणे येथील डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय इमारतीच्या डागडुजी करीता १५ कोटींचा निधीची फाईल सादर केली असुन ती शासन दरबारी धुळ खात पडुन आहे.  संभाजिनगर येथील मिलिंद महाविद्यालय इमारतीच्या डागडुजी करीता १५ कोटींचा निधीची फाईल सादर केली असुन ती शासन दरबारी धुळ खात पडुन आहे. संभाजिनगर येतील पीईएस पॉलिटेक्निकल इमारतीच्या डागडुजी करीता १५ कोटींचा निधीची फाईल सादर केली असुन ती शासन दरबारी धुळ खात पडुन आहे. सरकारच्या या आंबेडकरविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. तरी तमाम आंबेडकरप्रेमी जनतेने आणि विद्यार्थी वर्गाने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कांबळे यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com