धारावी बचाव आंदोलनाने तीव्र आंदोलनाचा इशारा देताच, DRPPL चा भूमिपूजन कार्यक्रम रद्द केला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा अगदी छुप्या पद्धतीने भूमिपूजन सोहळा गुरुवारी अगदी पहाटेच्या वेळेस माटुंगा येथील RPF मैदानावर आरपीएफ ग्राऊंडवर उरकण्यात आला. धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने पहाटे धारावी लेबर कँपजवळील रेल्वेच्या ग्राऊंडवर हा सोहळा पार पडला. याला जोरदार विरोध होण्याची शक्यता असल्याने गुरुवारी भल्या पहाटे इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कोणत्याही मोठ्या नेत्याला, लोकप्रतिनिधींना अथवा सेलिब्रेटी व्यक्तींना न बोलवता पार पडल्याने सर्वत्र जोरदार टीका सुरू झाली आहे.
एकीकडे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला स्थानिकांकडून जोरदार विरोध होत आहे. लोकप्रतिनिधी विशेष करून महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदार आणि धारावीच्या माजी आमदार वर्षा गायकवाड या प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेऊन विरोध करीत आहेत. तरीही अदानी समुहाकडून आणि सरकारकडून प्रकल्पाबाबतीत प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यात येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वेला प्रचंड विरोध असूनही धीम्या गतीने, छुप्या पद्धतीने सर्वेचे काम सुरूच आहे. धारावी प्रकल्पाकरिता अदानीला वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा देण्याचा सपाटा सरकारने सुरूच ठेवला आहे. आणि आता गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत अगदी भल्या पहाटे भूमिपूजन सोहळा देखील पार पडला असल्याची माहिती प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. अशा दोलायमान परिस्थितीमुळे धारावीकरांच्या मनामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. इतकेच नव्हे तर गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी कंपनीच्या माध्यमातून धारावीच्या पुनर्विकासाचा श्रीगणेशा असे होर्डींग लागले आहेत. यासाठी गणेश उत्सव मंडळांना प्रचंड मोठ्या देणग्या देखील कंपनीकडून देण्यात आल्याची माहीती मिळत आहे. मात्र यामुळे धारावीकरांच्या मनामध्ये अधिकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे नक्की काय सुरू आहे असा प्रश्न प्रत्येकजण एकमेकाला विचारत असल्याचे दिसत आहे.
सेक्टर 6 मध्ये झालेल्या या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. धारावी पुनर्विकासाच्या निविदेनुसार, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये सरकारकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. आजचा दिवस हा समस्त धारावीकर आणि मुंबईसाठी ऐतिहासिक दिवस होता कारण धारावी पुनर्विकास प्रकल्पाने आधुनिक धारावीच्या निर्मितीमध्ये मोठे पाऊल उचलले आहे, जे भविष्यात धारावीकरांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा घडवून आणेल. पुनर्विकासाची गती वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी सध्या राज्य सरकार धारावीत घरोघरी जाऊन पात्र आणि अपात्र रहिवाशांचं सर्वेक्षण करत आहे.
DRPPL च्या सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ... गुरुवारी, झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याचे महत्त्व हे केवळ धारावीच्या रहिवाशांसाठी आणि व्यवसायिकांपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. किमान 10 लाख लोकांना मोठ्या, आधुनिक घरांसह उच्च दर्जाच्या सुविधा या पुनर्विकास प्रकल्पामुळे मिळणार आहेत. या सुविधांच्या लाभाला इथले लोक पिढ्यानपिढ्या मुकले होते. या पुनर्विकासामुळे धारावीतील अनेक लघु उद्योगांना लाभ होईल. या लघुउद्योगांनी आपली स्वतःची अशी छोटेखानी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. परंतु, अपुऱ्या जागेअभावी त्यांना अत्यंत खराब स्थितीत राहून काम करावं लागतंय. हा भूमिपूजन सोहळा आधुनिक धारावी निर्माण करण्यासाठीच्यादृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल होतं. आम्ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या विभागाचा पुनर्विकास करतो आहोत. आम्ही धारावीकरांना ‘key to key' म्हणजे थेट घराची चावी देण्याबद्दलच आश्वासित केले आहे. ज्यात विद्यमान रहिवाशांना तात्पुरत्या निवाराकेंद्रात स्थलांतरीत न करता निश्चित कालावधीत घरे देण्याची ग्वाही दिली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा भारताला जागतिक स्तरावर नेणारा प्रकल्प ठरणार आहे. या नवीन शहरांमध्ये अत्याधुनिक सुविधांची पूर्तता केली जाईल. ज्यात शाळा, रुग्णालये, उद्याने आणि उत्तम रस्ते असतील. सर्व पात्र आणि प्रदूषण न करणाऱ्या उद्योग आणि व्यावसायिकांचं धारावीमध्येच पुनर्वसन केलं जाणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. इथल्या उत्तम पायाभूत सुविधा व्यवसायांना विस्तारण्यास अधिक सक्षम करतील. तर कौशल्य-विकास केंद्र या लोकांना नवीन ज्ञान मिळवण्यास, शिकण्यास आणि त्यांच्या उत्पन्न क्षमतेत वाढ करण्यास मदत करतील. याशिवाय, या सगळ्या व्यवसायांना पाच वर्षांसाठी SGST परतावा दिला जाईल. ज्यामुळे त्यांच्या वाढीला आणि शाश्वततेला आणखी पाठिंबा मिळेल."
https://www.youtube.com/watch?v=wlVQvxJ7k90
0 टिप्पण्या