दिनांक 15 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. या लोकशाही दिनानिमित्त मुंबईतील 'सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) संस्था जी लोकशाहीच्या वृद्धीसाठी लोकशाहीचा सन्मान, संविधानाचा सन्मान तसेच संविधानाचा प्रचार प्रसार आणि लोकशाहीची मूल्य जनमानसात रुजविण्याकामी सशक्तिकरणाचे कार्यक्रम अंतर्गत कार्यरत आहे. सीपीडी संस्थेने दिनांक 15 सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी ' लोकशाहीचा जागर सप्ताह-निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. लोकशाही वर चर्चा व्हावी, चिंतन व्हावे , भारतातील लोकशाहीमध्ये फक्त मत अधिकार देणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही तर शासन प्रशासनामध्ये निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग कसा वाढेल? या दृष्टिकोनातून लोकशाही सशक्त आणि सुदृढ लोकशाही होवून लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार होण्याकरिता सदर लोकशाहीच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकशाही दिनानिमित्त लोकशाहीवर चर्चा करण्याची संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देश्याने सेंटर फॉर प्रमोटिगं डेमोक्रसी (सिपिडी) च्या वतीने मुंबईतील वस्त्यांमध्ये पथनाट्य, परिसंवाद आणि कला प्रदर्शनाच्या माध्यमातन मुंबईभरात लोकशाहीची पंचाहत्तरी साजरी करण्यासाठीची सुरूवात सिद्धार्थ नगर,अंधेरी (वेस्ट ) या श्रमिक वस्तीतील युवकांनी पुढाकार घेत पथनाट्यद्वारे केली आहे. याच प्रकारे पुढे १६ सप्टेंबर पासुन ते २१ सप्टेंबर पर्यंत जयभीम नगर ( रे रोड) , इंदिरा गांधी नगर (शिवडी) , मंडाला (मानखुर्द) , भीम नगर (मानखुर्द), चिकुवाडी (बोरीवली) , गणपत पाटील नगर (दहिसर) या वस्त्यांमध्ये आपण 'कहाणी लोकतंत्र की!' या विषयावरील पथनाट्य आठवडा भर सादर करीत आहोत. तसेच १८ सप्टेंबर रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट गोरेगाव पश्चिम येथे 'लोकशाही व आम्ही भारताचे लोकं ' या विषयावरील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार ,बुद्धिवंत आणि संविधान प्रेमी विशेष तज्ञांचा परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर कला प्रदर्शनाचे सुध्दा आयोजन केले असल्याचे सीपीडीचे समन्वयक विशाल जाधव यांनी सांगितले. सदर 'लोकशाहीच्या जागर सप्ताह' मध्ये मुंबईतील संविधान प्रेमी आणि लोकशाही वर विश्वास असणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी सहभागी व्हावे व लोकशाहीचा प्रचार प्रसार करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या