भायखळा विधानसभा क्षेत्रात होत असलेली अनेक गैरकानुनी कामे याबाबत करण्यात आलेल्या तक्रारी तसेच SRA व म्हाडातील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागातील अधिकारी हे राजकीय व स्थानिक गुंडांच्या दबावाखाली कारवाई करत नाही. या संदर्भात सम्राट शेअर् अॅन्ड केअर असोसिएशनच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा मयुरी शिंदे, सरचिटणीस संतोष शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनच्या वतीने भायखळा विधानसभा क्षेत्रात होत असलेली अनेक गैरकानुनी कामांबाबत आणि भायखळा येथे राजरोसपणे सुरु असलेल्या भ्रष्टाचार आणि ड्रग्ज माफियाबाबत डॉ.मयुरी शिंदे यांनी विस्तृतपणे माहिती दिली.
18 में 2024 रोजी रात्रीच्या वेळी माझगांव येथील शिवसेना शाखेच्या समोर अखिल भारतीय सेनेचे माजी नगरसेवक सुनिल घाटे यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यावेळी यशवत जाधव यांच्या सांगण्यावरून समंजसपणाची भूमिका घेतली. मात्र हा हल्ला परिसरात सुरु असलेल्या अनधिकृत् बांधकाम व अमली पदार्थाचा व्यापार याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीमुळे झाला असल्याचे कळत आहे. इतकेच नव्हे तर आशा गवळी यांनी अनेक खोटे आरोप करून आमच्याविरोधात तक्रार केली आहे. तरी याबाबत आम्ही राज्य पोलिस आयुक्तांकडे जी SIT चौकशीची मागणी करत आहोत. कारण या आधी देखील सुनिल घाटे यांनी 'तू बी आय टी चाळीत राहतोस आणि निवडणुकीत उमेदवारी करतोस' अशी जातीवाचक धमकी दिली होती. पोलिस प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करावी तसेच माझ्यावर करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींबाबतही चौकशी करावी अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली.
SRA ओमकार टॉवर मधील गैरसोयी बाबत आजपर्यंत अनेक तक्रारी करण्यात आल्या असून त्यांना प्रशासनाचे अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत. केवळ २० मजल्याची परवानगी असताना वर अधिकचे मजले बांधण्यात आले आहेत. तिथे जे रहिवाशी रहायला आले आहेत. त्यांना अद्यापही वीज कनेक्शन मिळालेले नाही. इतकेच नव्हे तर 1 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा लिफ्ट पडल्यामुळे मृत्यु झाला. बिल्डरच्या विरोधात तक्रार करूनही कोणतीही कारवाई नाही. तसेच रहिवाशांचे भाडेसुद्धा दिले जात नाही. असे असूनसुद्धा बिल्डरवर सरकारी अधिकाऱ्यांची मेहरबानी आहे. या विरोधात दाद कोणाकडे मागायची असा सवाल असोसिएशनच्या उपाध्यक्षा साक्षी पाटोले यांनी केला.
मराठा आरक्षणाकरीता मनोज जरांगे यांचे आंदोलन योग्य आहे. गरिब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक जातीच्या संख्येप्रमाणे आरक्षण दिले गेले पाहिजे. आर्थिक निकषावर आरक्षण नको कारण जातीच्या समाजाच्या नावावर विषमता होते. हे फुले- आंबेडकर यांच्या बाबतीत समाजाने पाहिले आहे. ओबीसी फुले यांना ब्राम्हणांनी वरातीतून बाहेर काढले. सुभेदाराचा मुलगा असलेले बाबासाहेब मात्र तरीही त्यांना वर्गाबाहेर बसवले जात होते. समाजात अद्यापही जातीव्यवस्था असल्याने जातीनिहाय आरक्षण दिले गेले पाहिजे. याकरिता जातनिहाय जनगणना तात्काळ झाली पाहिजे. तरच जिसकी जितनी भागीदारी,,, उसकी उतनी हिस्सेदारी प्रमाणे समता निर्माण होईल. या सर्व सामाजिक प्रश्नांवर लवकरच धोरणात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. वरील सर्व मुद्यांची सखोल चौकशी व्हावी म्हणून 2 सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही संतोष शिंदे यांनी यावेळी जाहिर केले.
0 टिप्पण्या