माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झाला. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. दरम्यान, आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना जसाश तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. कोल्हापूरातील विशाळगडावर झालेल्या दंगलीला संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार आहेत, असं म्हणत त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज १ ऑगस्ट रोजी ठाण्याजवळ जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला.
मी त्यांना छत्रपती संभाजी आणि राजे बोलत होतो, पण त्यांनी जी दंगल घडवली आता त्यांना मी त्यांना राजे म्हणणार नाही. हल्ला करणारे तिघेच होते. माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या. मी याला हल्ला म्हणणार नाही. सामाजिक एकता या घराण्याने राखली पाहिजे होती. मी अजून त्वेशाने आणि तीव्रतेने बोलेन. स्वतः च्या वडिलांनी तुमचा निषेध केला. आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याशी संभाजीने गद्दारी केली आहे. त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू, मी मेलो तरी माफी मागणार नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी त्यांच्यामुळे मशीद तोडली गेली. ते आरोपी आहेत, आरोपी नंबर एक संभाजी आहे. मी वाईट वैचारिक लढाई सोडणार नाही. माझी कोणाविषयी तक्रार नाही. शिव, शाहू, आंबेडकर ही नाव घेऊन आम्ही जगतो आणि मरू देखील. - राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडया हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. यावेळी आव्हाड समर्थकांनी राज्य सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान आज विशालगड प्रकरणी सत्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी विविध संघटनांनी मुंबईत प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेकरिता ज्येष्ठ समाजसेवक तुषार गांधी आले होते. त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात हे असेच घडत राहणार कारण महाराष्ट्राचा गृहमंत्रीच आपल्या विरोधी विचार करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतो. कोणीही चकार शब्द काढत असेल त्याला ठोकून काढा आदेशाची वाट पाहू नका असे भर सभेत जाहिर सांगणाऱ्या गृहमंत्र्यालाच आधी जेलमध्ये टाकले पाहिजे. जे जाहीरपणे विद्वेशाचे राजकारण करीत आहेत त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार
0 टिप्पण्या