Top Post Ad

महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा संपन्न

महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला, या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अस्लम शेख, शिवसेना खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.  

भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदीशाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू,  लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे, सत्तापक्ष व विरोधपक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत पण स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना योग्य स्थान दिले नाही, हा लोकशाहीचा खून आहे. भाजपामध्ये सत्तेची घमेंड व गर्व अजून आहे, विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती सत्तेतून बाहेर काढली पाहिजे. -  नाना पटोले  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे, महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत, या महिल्या खासदार भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे. लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे, राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, - काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात 

महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. दर वाढवून टेंडर द्यायचे व त्यातून टक्केवारी घेऊन लुट सुरु आहे. मुंबईत आता कुकर घोटाळा सुरु झाला आहे, ६०० रुपयांचे कुकर अडीच हजार रुपयांना विकत घेऊन प्रत्येक वार्डात ४० ते ५० हजार कुकर वाटले जात आहेत. भाजपने वफ्क बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा पुढे आणला आहे परंतु हिंदू धर्माच्या देवस्थानची जमीन असो वा मुस्लीम धर्माच्या देवस्थानच्या जमिनींना हात लावाल तर ते सहन केले जाणार नाही, - प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान

महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे पण लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. धारावी, मुलुंड, वरळी, देवनार, मिठागरांची जागा अशा मुंबईतील सर्व महत्वाच्या व मोक्याच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत. महानगर पालिकेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू,  ‘लाडकी बहिण’ योजनेची सध्या चर्चा सुरु आहे पण महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही सर्वात आधी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारने आणली आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन केंद्रात सत्ता आल्यास गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये म्हणजे महिन्याला ८५०० रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने न्याय पत्रात दिले होते. महायुतीने काँग्रेसच्या न्याय पत्राची नक्कल केली आहे. बहिणांचा सन्मान झाला पाहिजे याबाबत दुमत नाही परंतु महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे आणि महायुतीला मतदान केले नाही तर हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत. हा पैसा काही कोणाचा पार्टी फंड नाही, हा पैसा जनतेच्या घामाचा, कष्टाचा व रक्ताचा पैसा आहे,  लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील वातावरण बदलले आहे, ढगाळ वातावरण झाले आहे. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, असे चित्र आहे. संसदेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासारखा वाटतो तर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षासारखे वागत आहे. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले हे १० वर्षांत पहिल्यांदा घडले आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाल्याने मोदी सरकारचे आता एनडीए सरकार झाले आहे असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मुंबईत सहा पैकी पाच जागा मविआने जिंकल्या, एक जागा महायुतीने चोरली. विधानसभा निवडणुकीतही मुंबईसह महाराष्ट्रात इतिहास घडणार आहे, भाजपा युती सरकारचा पराभव करून महाविकास आघाडीचे सरकार येईल,  - मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com