Top Post Ad

सर्व धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत

राज्यातील भाजपा युती सरकार मागील दोन-अडीच वर्षापासून मुंबई विकण्याचे काम करत आहे. मुंबईतील जागा अदानीला कमी किमतीत दिल्या जात आहेत. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली जमीन हडपण्याचा मोठे षडयंत्र मोदानीच्या इशाऱ्यावर सुरु आहे. भाजपा सरकारला धारावीकरांची चिंता नसून अदानीच्या हिताची जास्त चिंता आहे. अदानीसाठी पायघड्या घातल्या जातात, सर्व नियम बदलून धारावी घशात घालण्याचा कुटील डाव आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत मुलुंड, देवनार किंवा इतर ठिकाणी धारावीकरांना हलवू देणार नाही, सर्व धारावीकरांना ५०० चौरस फुटाचे घर देऊन धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे, या मागणीवर आजही ठाम असल्याचा पुनरुच्चार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.  

मुंबईकरांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा सुरु असून आज रविवारी ही न्याय यात्रा धारावीत धडकली. जनतेशी संवाद साधून प्रा. वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, यावेळी प्रा. गायकवाड म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसत असल्याने घाबरलेल्या भाजपा युती सरकारला आता बहिण, भाऊ, सगळे सगसोयरे आठवत आहेत. परंतु मागील दोन वर्षात या सरकारला फक्त अदानी, बिल्डर व कंत्राटदारच लाडके होते. मुंबईकरांच्या जमिनी, कष्टाचा पैसा सरकारने लाडक्या बिल्डर, कंत्राटदारांवर उधळून त्यातून कमिशनखोरी केली आहे. मागील ७ दिवस मुंबईच्या विविध मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधला, आजही सर्वसामान्य मुंबईकर पायाभूत सुविधांपासून वंचित आहे मग भाजपा युती सरकारने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून कोणाचे खिशे भरले? असा सवाल गायकवाड यांनी विचारला आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी संध्याकाळी मोदानीच्या भ्रष्टाचाराची दहिहंडी फोडली व विधानसभा निवडणूकीत मुंबईतून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागांवर विजयी करा व महाभ्रष्ट युती सरकारला घरी बसवा, असे प्रा. वर्षा गायकवाड यांनी आवाहन केले.  रविवारी मुंबई न्याय यात्री धारावी विधानसभा मतदार संघातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा माटुंगा कॅम्प, जास्मिन मिल रोड, कमला नगर, गीतांलजी अपार्टमेंट, माहिम फाटक, धारावी क्रॉस रोड, धारावी रेस्टॉरंट, पेरियार चौक, संत कक्कय्या मार्ग, धारावी मेन रोड या भागातून निघाली.  या यात्रेत मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, डॉ.ज्योती गायकवाड आणि ईतर नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com