Top Post Ad

राजकारणातील 'पवार फॉर्मुला',

 पवार साहेब आहेत... ते समजनऺ अवघड आहे? समजून घ्या.. पवार कुटुंबातील जिंकणारा व्यक्ती पुढच्या दाराने लोकसभा व विधानसभा सभागृहात आणि पवार कुटुंबातील हरणारी व्यक्ती मागच्या दाराने बिनविरोध राज्यसभा व विधान परिषद या सभागृहात ..

भारतीय संसदीय राजकारणात  शरद पवार यांचा निर्णय होता की ते स्वतः राज्यसभेत असतील व कुटुंबातील व्यक्ती लोकसभेत पाहिजे. २०२४ लोकसभा निवडुकीदरम्यान पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर कदाचित असे असेल संसद हे सर्वोच्च सभागृह आहे तिथे आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती पाहिजे आणि अलिखित करार असणार की हरणाऱ्या माणसाची तडजोड होती की राज्यसभेत जाणार म्हणजे काय झालं एकाच घरातली सुप्रियाताई लोकसभेत गेल्या आणि सुनेत्राताई राज्यसभेत गेल्या. एकूणच काय तर "पवार" या एका कुटुंबातील एक लोकसभेत आणि पवार साहेब आधीच राज्यसभेत होते त्या सभागृहात आणखी एक पवारांची सूनबाई यांची वर्णी लागली. आता देशाच्या सर्वोच्च सभागृहात पवार कुटुंबातील तीन व्यक्ती झाल्या. आता सेम फॉर्मुला विधानसभेच्या वेळेस असेल हे सध्या अजित दादा पवार यांचे मीडियासमोर येणाऱ्या विधानातून अलिखितपणानं स्पष्ट होताना दिसून येत आहे. पूर्वी शरद पवार अजित पवार एकत्र असताना एकूण चार सदस्य लोकसभेत होते पक्ष फुटी नंतर दोघांचे मिळून एकूण नऊ झाले आणि राज्यसभेत एकत्र असताना एक सदस्य होते फुटी नंतर दोन झाले. 

अजितदादा विधानसभेत आगोदरच आहेत आणि रोहित पवार हे घरातली आणखी एक सदस्य फारच कमी कालावधीत राज्याचे नेते झालेले आहेत व मागच्या वेळेस विधानसभेत पोहोचलेत. समजून घेतलं पाहिजे किंवा मागील विधानसभेच्या तिकीट वाटपा संदर्भात झालेल्या चर्चा आठवल्या पाहिजेत रोहित पवारांना शरद पवार तिकीट देत नव्हते व अजित पवारांनी जिल्हा परिषदेला आणि विधानसभेला रोहित पवार असावे अशी भूमिका घेऊन त्यांना तिकीट दिलेला आहे असं शरद पवारांची त्यावेळीची नाराजी आणि अजित पवारांचे मीडिया समोरची भूमिका होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता चर्चा आहे की बारामती मधून कोण लढणार युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार आणि अजित पवार बारामती मधून लढणार की जामखेड मध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार हा सामना होणार. तसं बघितलं तरी ते बोलत नसतील मात्र त्यांच्या डोक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील किंवा पवार कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रातील ज्या प्रभाव क्षेत्रात सुरक्षित असा एखादा विधानसभा निश्चितपणाने आणखी एखादा कुटुंबातील सदस्य सभागृहात पाठवण्यासाठी असेलच. ती विधानसभा किंवा राज्यसभेची जागा की विधान परिषदेची जागा किंवा पार्थ पवार यांचं नाव अजून पुढे आलेलं नाही. ह्या पार्श्वभूमीवर बारामतीकर " पवार " समजून घेणे किती अवघड आहे हे लक्षात येईल. परंतु पवार घरातला- कुटुंबातला सदस्य विधान परिषदेत नसल्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही हरणारी व्यक्ती ही विधान परिषदेत जाणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे शरद पवारांच्या घरातली सदस्यांची संख्या ज्या पद्धतीने लोकसभेत एक आणि राज्यसभेत दोन झाली तशी विधानसभेमध्ये दोन आणि विधान परिषदेत एक असे आकडे होणार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातली किमान सहा सदस्य या संसदीय राजकारणात केंद्रात तीन आणि राज्यात किमान तीन (प्रभाव क्षेत्र असल्यामुळें राज्यात संख्या वाढू शकते ) सदस्य राहणार. आता या बाबतीत अजितदादांनी ची भूमिका घेतली आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि काही प्रमाणात सूचक वक्तव्य केलेल आहे, की सुनेत्रा पवारांना सुप्रियाच्या विरोधात उभा करणे ही माझी चूक होती याचा अर्थ स्पष्ट आहे की, ज्या पद्धतीने तिथं घरातला माणूस निवडून आणला तसा या ठिकाणी घरातला माणूस निवडून द्या अशा पद्धतीचे हे वक्तव्य राजकारण समजणाऱ्याला कदाचित कळेल.  

जर हे घरातली माणसं एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची रणनीती शरद पवार आणि अजित पवार का करतात हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना यांना निश्चितपणे कळत असेल का? तर मग त्यांनी ही भूमिका घेऊ नये का? जर समजा बारामती मधून अजित पवार उभे राहत नसतील तर अजित पवार व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचा किंवा एकनाथ शिंदेच्या शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार द्यावा या पद्धतीचा विचार का पुढे येऊ नये? कदाचित मागच्या लोकसभेच्या वेळेस सुप्रिया ताईच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कणखर उमेदवार असता तर कदाचित चित्र वेगळं असतं असं राजकारणातील अभ्यासकांचं मत आहे. नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय कुटुंबाची फुट का आपल्या कुटुंबातील लोकांना संधी आणि दोन्ही गटाचे मिळून सदस्य संख्या वाढवण्यासाठी केलेली रणनीती ह्या गोष्टी समजणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या पक्षातील सदस्य संख्या वाढवणं आणि त्याचबरोबर कुटुंबातील लोकांना अधिक संधी उपलब्ध करून देणे या एकमेव गोष्टीसाठी राजकारण्यांचा व मतदारांचा करत असलेला संभ्रम, केलेली चूक की नाटक आहे का? असं आपल्याला समजता येईल आणि मीडियाच्या माध्यमातून ही अधिक बिंबवण्याचं काम सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये होताना दिसून येत आहे, त्यामुळे हे जे राजकारण आहे हे बदलत्या स्वरूपातलं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.शरद पवार आणि अजित पवार राजकारणातला पुढील अध्याय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लिहिणार आहेत हे समजुन घेणे आवश्यक आहे. पार्श्वभूमीवर सदाभाऊ एका भाषणात बोलल्याप्रमाणे, 'पवार साहेब आहेत ते समजनें अवघड आहे'? तसेच पक्ष फुटी घराण्यातील वाद रक्षाबंधनला एकत्र येणार का यातूनच आपल्या पक्षाची आणि कुटुंबातील सदस्य संसदीय राजकारणात संकेत अधिक होत आहेत का? हे समजून घ्या.....

  • प्रवीण मोरे 
  • रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता
  • खारघर, नवी मुंबई. 
  • १८ ऑगस्ट २०२४


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com