29 जुलै रोजी वैयक्तिक वादातून काही मुलांचे आपापसात भांडण झाले त्याच्या वादामध्ये एका मुलाचा चाकू लागल्याने मृत्यू झाला. मात्र या प्रकरणाला काही जातियवादी संघटना आपला हेतू साध्य करण्यासाठी हिंदू-मुस्लिम रंग देऊन दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे निषेधार्ह आहे. या बाबत धारावी बचाव आंदोलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तसेच धारावीतील अनेक मान्यवरांची दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता राजे शिवाजी विद्यालय धारावी येथे तातडीची बैठक पार पडली. ज्यामध्ये या गोष्टीवर गांभिर्याने चर्चा करण्यात आली. या गोष्टीचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात आला. धारावी हा विभाग छोटा भारत आहे जिथे हिंदू आणि मुस्लिमसह सर्वच संप्रदायाचे लोक एकत्र राहत आहेत. या सर्वांचे एकमेकांशी केवळ स्नेहसंबंधच नाही तर उपजीविकेचे नातेही आहे. या परिसरात असणाऱ्या कारखान्यात हजारो हिंदू आणि मुस्लिम एकत्र काम करतात. या मिनी इंडियाला आग लावण्याचे आणि जातीय सलोखा बिघडवण्याचे काम काही राजकीय पक्षाचे लोक आपल्या जातियवादी संघटनांच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.
आंध्र प्रदेशातील एक बनावट व्हिडिओ हिंदू राष्ट्रवादीवर पोस्ट करण्यात आला होता जो बीएमसी आणि धारावी पोलिसांनी अजूनही काढलेली नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून धारावी बचाव चळवळीने सर्व धारावीवासीयांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. धारावीतील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करणाऱ्या जातीयवादी संघटनांपासून दूर राहून धारावीत शांतता राखा तसेच आणि समितीच्या माध्यमातून आम्ही धारावी आणि धारावीच्या जनतेला अदानीपासून वाचवण्यासाठी लढत आहोत. अशा वेळी या संघटना धारावीतील नागरिकांमध्ये द्वेषाची बीजे पेरून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यामुळे आपल्या घराचे आंदोलन जे आपण मागील ४० वर्षापासून लढत आहोत ते कमकुवत होईल आणि अदानीला संधी मिळेल. या जातीयवादी संघटनांचे नेते अदानींचे दलाल आहेत. त्यांचा मनसुबा साध्य करण्यासाठी या अशा गोष्टींना जातीय रंग देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु होत आहे. यापासून सावध रहा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले
1 ऑगस्ट 24 रोजी जातीय भावना भडकवणारे बॅनर व होर्डिंग्ज काढण्यासाठी G Nort अधिकाऱ्याची भेट घेवून DSP झोन 5 ला जातीय वातावरण बिघडवणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी पत्र देण्यात येणार असून धारावीतील जातीय सलोखा कायम रहावा याकरिता 3 ऑगस्ट 24 रोजी दुपारी 4 वाजता अशोक मिल कंपाऊंड ते माटूंगा लेबर कॅम्प शांतता पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच धारावी बचाव आंदोलन तीव्र करण्यासाठी निदर्शने, होर्डिंग्ज आणि हँडबिल तयार करणे आणि पथ सभा घेण्याचे काम सातत्याने सुरू राहील यासाठी सर्व धारावीकरांनी सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. माजी आमदार बाबुराव माने,अनिल शिवराम कासारे, अॅड.संदिप कटके,वंसत खंदारे, साम्या कोरडे, नसुरूल्ल हक्क ,उल्लैश गजाकोश आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातुन धारावी विभागात शातंता प्रस्तापित व्हावी त्याकरीता शांति मार्चचे आयोजन करण्यात आले होते त्या करीता धारावी पोलिस ठाणे ह्या ठिकाणी पोलिस उपायुक्त ,सहाय्यक आयुक्त,व धारावी वरिष्ठ पोलिस निरिक्षक ह्यांची भेट घेण्यात आली तद्प्रसंगी उपायुक्त आयु.सातपुते मॅडम यांच्या शब्दाचा सन्मान करुन काढण्यात येणारा शांती मार्च रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला व धारावी पोलिस प्रशासनाच्या वतीने धारावी मध्ये शातंता प्रस्तापित करण्या करीता जे जे सहकार्य लागेल ते धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातुन पोलिस प्रशासनास करण्यात येईल असा शब्द देण्यात आला सदर प्रसंगी माजी आमदार बाबुराव माने,अनिल शिवराम कासारे,अॅड.संदिप कटके,वंसत खंदारे,साम्या कोरडे,नसुरूल्ल हक्क ,उल्लैश गजाकोश आदि धारावी बचाव आंदोलनाचे समनव्यक उपस्थित होते
0 टिप्पण्या