महाराष्ट्रातील सारथी, बार्टी व महाज्योती संस्थांमधील २०२२ व २०२३ या वर्षातील ३५०० संशोधक विद्यार्थ्यांना अधीछात्रवृत्ति न मिळाल्याने विद्याथ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. संशोधक विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच शासनापर्यंत आपला आवाज पोहोचविण्याकरिता या संशोधक विद्यार्थ्यांचा फेलोशिपच्या न्याय्य मागणीसाठी पुण्याच्या फुले वाड्यापासून विधान भवनाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांचा ' लाँग मार्च 'आज मुंबईच्या आझाद मैदानात धडकला. या लाँगमार्च मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांची तब्येत बिघडली असून पायावर सूज आली आहे तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती बार्टी, सारथी, व महाज्योती या संस्थेकडे अर्ज करणाऱ्या व पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सीमा वानखेडे, विद्या कांबळे, रोहित तिकुटे, तनुजा पंडित,वैभव जानकर, अपेक्षा शिंदे, तैयेब मुलानी, तुकाराम जाधव इत्यादीनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पावसात कशासाठी फेलोशिप च्या हक्कासाठी,लढगे - जितेंगे ,आमची मागणी मान्य झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत फेलोशिपच्या न्याय्य मागणीसाठी २४ जून रोजी फुलेवाड़ा पुणे ते मंत्रालय मुंबई असा 'लाँग मार्च'चे आयोजन करण्यात आले.या विद्यार्थ्यांच्या लाँग मार्चची दखल घेत २५ जून २०२४ रोजी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्वरित बैठक आयोजित करण्याचे आस्वासन दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपला लॉग मार्च सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे स्थगित करण्याचा निर्णय घेतला. २५ जून २०२४ रोजी मुंबई च्या सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बार्टीच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. या बैठकीत संशोधक विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. मात्र आज पर्यत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत.त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी पुन्हा पुणे ते मुंबई पायी चालून लाँग मार्च काढला. मात्र हा लाँगमार्च पोलिस प्रशासनाने नवी मुंबई येथेच अडवला आणि पोलिस व्हँनमधून या विद्यार्थ्यांना आझादमैदानात आणून सोडले आहे.
0 टिप्पण्या