फोडा, झोडा आणि राज्य करा, खरंतर ही निती या देशात इंग्रजांनी वापरली असं म्हणतात. हे अर्धसत्य आहे. ही निती इंग्रजांना सांगितली कुणी हे शोधणं आज गरजेचं आहे. या नितीचे उद्गाते कोण असतील तर या देशावर हजारो वर्षापासून राज्य करीत असलेले विदेशी आर्य. याच लोकांनी ही निती समस्त आशियाखंडातील बहुजन वर्गाला असंघटीत करण्यासाठी वापरली. आणि आपली सत्ता अबाधित ठेवली. ती आजही अबाधितच आहे. आजही त्याच नितीने बहुजन वर्गावर हे विदेशी लोक राज्य करत आहेत. अठरापगड जातीत या बहुजन वर्गाला विभागून त्यांनी आपला सत्तेचा अंकुष येथे रोवला तो आजपर्यंत कायम आहे. या अंकुषाला जेव्हा इंग्रजांनी छेद द्यायला सुरुवात केली तेव्हा चले जाव आंदोलनाने जोर धरला. त्याआधी अनेक आंदोलने झाली मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ती आंदोलने मोठी होऊ दिली नाही. इंग्रजांच्या दरबारी कारकूनगिरी करणाऱ्या या मंडळींनी फितुरीने ही आंदोलने दडपली. ही मंडळी कोण होती? त्या काळात बहुजन वर्गाला शिक्षणाची बंदी होती. मग शिक्षित वर्ग कोण तर हा विदेशी आर्य. हाच वर्ग खऱ्या अर्थाने इंग्रजांची चाकरी करीत होता. इथल्या बहुजन वर्गाला कायमस्वरुपी गुलामगिरीत ठेवण्यासाठी इंग्रजांना माहिती पुरवत होता. म्हणूनच आदिवासीं जमातीतून अनेक क्रांतीवीर निर्माण झाले. पण पुढे जाऊन ते समाजाचे नायक बनू नये म्हणून त्यांचे कार्य दडपण्याचे काम बेमालुपणे या लोकांनी केले. मात्र कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आज इतिहास लोकांपुढे येत आहे. हा वेगळा भाग आहे की, त्यातून बहुजन समाज आजही शहाणा होत नाही. अन्यथा महापुरुषांची अवहेलना करणाऱ्या भीडेप्रवृत्तीला केव्हाचेच ठेचले असते.
0 टिप्पण्या