
म्हणुन विरोधी आघाडीत घुसवत असतो. याशिवाय लहान-सहान जातीगटाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते, प्रचंड महत्वाकांक्षी वाचावीर, फुटकळ नेते हे भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी हवा असलेला कच्चा माल म्हणून उपयोगात येतात. जेथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या मतदार संघात अपक्ष म्हणुन उभे राहणारे मुस्लिम उमेदवार, जेथे बौद्ध मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या मतदार संघात अपक्ष म्हणुन उभे राहणारे बौद्ध उमेदवार हे भाजप प्रायोजित असतात. त्यांना होणारा वित्तपुरवठा भाजपा कडून होतो असे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन या, प्रति माणशी 2-5 हजार घ्या, दुसर्या दिवशी मतदान न केल्याची खूण म्हणुन बोटाला शाई लागलेली नाही हे दाखवा व मतदान ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन जा, हा मार्ग अमलात आणला जातो. (मागील विधानसभा निवडणुकीत एका मतदार संघात अशा 20 हजार मुस्लिम मतदारांना प्रत्येकी 2000 देण्यात आले होते.) अशा प्रकारे बाजारात अगदी माफक किमतीत उपलब्ध असलेला हा मते कुजविणारा कच्चा माल योग्य प्रकारे नष्ट किंवा निष्प्रभावी केल्याशिवाय भाजपाच्या विरोधात निवडणूक जिंकणे सोपे होणार नाही
0 टिप्पण्या