Top Post Ad

5 फेब्रुवारी रोजी दिवंगत शांताबाई कांबळे आणि सुमंतराव गायकवाड यांची संयुक्त जाहीर श्रद्धांजली सभा


 रिपब्लिकन पक्षाच्या वतीने   आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ लेखिका पहिल्या दलित महिला आत्मचरित्रकार दिवंगत शांताबाई कांबळे आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लढाऊ ज्येष्ठनेते माजी आमदार दिवंगत सुमंतराव गायकवाड यांची संयुक्त जाहीर श्रद्धांजली सभा येत्या रविवार  दि.5 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4  वाजता  नवी मुंबई वाशी  येथील सेक्टर 15 येथील  गुजरात भवनजवळील  बुद्ध प्रतिष्ठान हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला एकनिष्ठपणे समर्पित केले.सत्ता मिळो अथवा न मिळो त्यांनी रिपब्लिकन ही ओळख कायम जोपासली. त्यांनीं कधीही रिपब्लिकन चळवळ सोडली नाही. रिपब्लिकन ऐक्या साठी ते नेहमीच आग्रही होते. माझ्या नेतृत्वाला त्यांनी एकनिष्ठ पणे साथ दिली होती.त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीने ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे. सुमंतराव गायकवाड यांनी अनेक वर्षे वरळी येथे वास्तव्य केले. ते माटुंगा लेबर कॅम्प मधून नगरसेवक म्हणून १९६९ मध्ये निवडून आले. ते बेस्ट कमिटी सदस्य राहिले. त्यानंतर सन २००६ साली त्यांना विधान परिषद सदस्य बनविण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर नवी मुंबईत ते राहावयास आले. नवी मुंबई येथे स्मारक उभारून दिवंगत सुमंतराव गायकवाड यांच्या स्मृती जोपासण्यात येतील. रिपब्लिकन पक्षासाठी आयुष्य समर्पित करणारे सुमंतराव गायकवाड यांच्या निधनामुळे एकूणच आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे,

 - केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले 


स्मृतीशेष सुमंतराव सिताराम गायकवाड हे त्यांच्या वडिलांचे पांच भाऊ, सर्वात लहान सुमंतराव होते त्यामुळे कुटुंबात सर्वांचे लाडके होते. त्यांचे मुळगांव- तरड, ता. कलटण, जि-सातारा, त्यांच्या आईचे नांब क्रिष्णाआई होते. त्यांचा जन्म - २५ जून १९३८ ला झाला. त्यांचे शिक्षण एलएलबी पर्वत झाले ते बीजगणितात प्रविण होते. फळटणचे राजे- नाईक निंबाळकर यांनी त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. 1969 साली पहिल्यांना माटुंगा लेबर कॅम्प येथून पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध असल्याने त्यांनी सुमंतराव यांना बेस्ट (बीईएसटी) समितीत सदस्य पदी घेत सामावून घेतले.

२००६ साली महाराष्ट्र राज्य विधानपरिसदेव सदस्य म्हणून त्यांना निवडुन आणले. ते शेवटपर्यंत रिपब्लिकन चळवळीत सक्रीय राहीले. मा आठवले साहेब यांच्या सोबत असतांना आठवले साहेब यांनी त्यांना सक्रीय सहकार्य केले. त्यांचे इतर राजकिय पक्षाशी वैयक्तिक स्नेहपूर्ण संबंध होते. कौटुंबिक दृष्ट्या त्यांचे स्मृतिशेष दादासाहेब रुपवते यांचेशी व्याही या नात्याने जवळीक होती. त्यांचे पुतणे बुद्धभूषण गायकवाड हे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर निवेदक म्हणून कार्यरत होते यात त्यांना सुमंतराव यांनी पाठबळ दिले एका अर्थाने भूषण- गायकवाड यांचे भूषण" होते.
- प्रल्हाद सोनावणेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com