- ठाण्यातील कळवा विभागात आदिवासी जमिनीवर अनधिकृत बांधकामे जोरात,
- 36 व 36 अ अटी/ शर्तीचा भंग. जमीन शासनाने परत घेण्याची मागणी.
- प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
ठाण्यातील कळवा येथे कळवेश्वर नगर, शंकर मंदिरामागे जुना बेलापूर रोड कळवा ठाणे येथे सर्व्ह क्र.383/2 वर 36 व 36 अ व भोगवटा वर्ग 1 अश्या विरोधाभास असणाऱ्या आदिवासी सातबारा शेत जमिनीवर, भूमाफिया व भ्रष्ट अधिकारी, स्थानिक राजकिय नेते यांच्या संगनमताने शासकीय नियम धाब्यावर बसवून सात माळ्याचे अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. आदिवासी शेत जमिनीवर कोणतीही शासकीय परवानगी न घेता, आदिवासी ची दिशाभूल/ लालच देऊन असं म्हणता येणार नाही कारण एक आदिवासी खातेदार स्वतः वकील आहे व त्यांना कायदा माहीत असतांना त्यांच्या परवानगी ने ही सदर अनधिकृत इमारत बांधकाम करण्यात येत आहे त्यामुळे कलम 36 व 36 अ च्या अटी/ शर्थीचा भंग झाला असल्याने सदर जमीन राज्य शासनाने नियमानुसार आपल्या ताब्यात घ्यावीअशी मागणी जोर धरू लागली आहे.
माध्यमातून मनपा प्रशासन व तहसीलदार यांना सदर बाब लक्षात आणून देउनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.भूमाफिया व भ्रष्ट अधिकारी, स्थानिक नेते यांच्या भ्रष्ट युतीमुळे इतर आदिवासींच्या वर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.सदर गँभीर विषयी आपण तातडीने कारवाई करावी.सदर प्रकरणात मा. न्यायालयात जनहितार्थ जनहित याचिका लवकरच दाखल करण्यात येत असून तरी आपण आदिवासी हक्क व कायद्याचे संरक्षण करावे ही आपणांस नम्र विनंती. सदर अनधिकृत बांधकाम त्वरित बंद करावे व भूमाफिया, भ्रष्ट अधिकाऱ्यांची तथाकथित आदिवासी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निर्धार या समाजसेवी संस्था यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
काही दिवसांपूर्वी याबाबत खारेगाव कळवा मधील अनधिकृत इमारतींना अभय कोणाचे? अशा आशयाचे बॅनरं लावण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याची चर्चा सुरु होती. मात्र गेंड्याची कातडी असलेली ठाणे महानगर पालिका याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत आहे. यामुळे आता ठाण्यातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या विरोधात नागरिक हक्क समितीच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे मत अनेक संघटनांनी व्यक्त केल्याचे समजते.
0 टिप्पण्या