Top Post Ad

... मात्र महागिरी-जांभळीनाका परिसरातील सर्व बांधकामांकडे दुर्लक्ष

 माजीवडातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे: ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. मात्र नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त कुणाच्या आदेशाची वाट पहात आहेत असा प्रश्न नौपाडा परिसरातील नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा प्रभाग समितीमध्ये देखील कारवाई करण्यात आली. मात्र नौपाडा प्रभाग समितीमधील बांधकामांबाबत वृत्त प्रकाशित होऊन देखील सहा.आयुक्त अजय एडके याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यांना आयुक्तांनी आदेश दिले नाहीत का असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.
१७ जुन रोजी प्रकाशित झालेल्या प्रजासत्ताक जनताच्या अंकात याबाबत विस्तृतपणे बातमी देण्यात आली होती.  नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत प्रचंड बांधकामे जोरात सुरु आहेत. काही बांधकामे आता शेवटच्या टप्प्यावर आली आहेत तर काही आता सुरु झाली आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात ही कामे सुरु असताना  पालिका प्रशासन नेमके काय करते?  ऐन पावसाळ्यात ही बांधकामे वेगाने सुरु आहेत. याकडे पालिकेतील कोणताही अधिकारी फिरकत नसल्याचे स्थानिक सांगतात. नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील जवाहर बाग लगत असलेल्या बाजारपेठेत सुरु असलेल्या बांधकामांवर मागील वर्षभरापासून कोणतीही कारवाई झालेली नाही.
तर तीन वेळा कारवाई करण्यात आलेली इमारत महागिरीतील ती इमारत अद्यापही जैसे थेच दिसून येत आहे. 

इतकेच नव्हे तर महागिरी कोळीवाडा परिसरातही नवीन बांधकामांना सुरुवात झाली आहे. बाजारपेठेतील मच्छीमार्केट जवळचे बांधकाम देखील पूर्ण होत आले आहे. तसेच जांभळी नाका, खारकर आळी येथील मंदीरासमोर देखील रिपेरिंगंच्या नावाखाली मोठ्या दुकानाचे बांधकाम सुरु झाले आहे. अशा तऱ्हेने नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीत बेधडक बांधकामे सुरु असताना सहा.आयुक्तांना ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश का दिले नाही असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. अगदी कमी वेळेत उभ्या राहणाऱ्या या इमारती भविष्यात किती हानीकारक असतात हे लकी कंपाऊंडच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. तरीही सहा.आयुक्त याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.  
  
  आज २१ जून रोजी   माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होडिंगसाठीचे अंदाजे ३० x २० चौ. फुट मोजमापाचे उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी फॅब्रिकेशन गॅस कटरच्या सहाय्याने कट करण्यात आले. ब्रम्हांड येथील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडून येथील विटांचे रेबिट जेसीबी मशिन व मनुष्यबळाच्या सहाय्याने हटविण्यात आले. तसेच नमिता पांडे, मनोरमानगर यांचे वाणिज्य १२ X १५ चौ. फुट मोजमापाची २ अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आलीत. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ-३ दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली. मात्र उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे यांना नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील एकाही बांधकामाबाबत माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1