"माता भीमाई" चे वंशज जीवन पंडित यांना शिवसेनेचे आर्थिक सहाय्य


शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सपत्नीक केली पंडित दांपत्याला जीवनावश्यक वस्तूची मदत

शहापूर
    
       महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे  "आजोळ" व माता "भीमाई " चे  माहेर असलेले ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील आंबे -टेंभे  येथे वास्तव्यास असलेले भीमाई चे वंशज जीवन पंडित हालाखीचे जीवन जगत असल्याचे वृत्त शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांना समजले असता. त्यांनी तात्काळ त्यांच्या पत्नी पुष्पलता प्रकाश पाटील यांच्या सोबत आंबे -टेंभे येथे धाव घेतली. आंबेडकर जयंतीचे सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला सारून भीमाईचे वंशज जीवन पंडित यांना शिवसेनेमार्फत तह्यात दर महिन्याला पाच  हजार रुपये आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आणि लगेच त्यांनी सहा  महिन्याचे 30 हजाराचा  धनादेश तात्काळ सुपूर्त केला. तसेच या बरोबर अन्न -धान्य, कपडे, चादर, ब्लॅंकेट, इत्यादी जीवनावशक साहित्य दिले .व  ते राहत असलेले घर मोडकळीस  आले असून त्याची दुरुस्ती करणार आणि विशेष म्हणजे "माता भीमाई" चा जन्म ज्या घरात झाला त्या घराचे बांधकाम देखील स्वखर्चाने प्रकाश पाटील करणार आहेत,असे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या