"ब्राह्मणवाद मुळासकट उखडून काढला पाहिजे" - पुन्हा एका अभिनेत्याचं खळबळजनक विधान

 मागच्याच वर्षी एका मुलाखतीत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक सुजय डहाके याने वक्तव्य केलं होतं. मराठी मनोरंजनसृष्टीत केवळ एका ठराविक जातीच्या लोकांनाच (म्हणजेच ब्राम्हण कलाकारांना) प्राधान्य दिलं जातं, मराठी चित्रपट असो किंवा सिरियल सगळीकडेच या लोकांची कंपूशाही आपल्याला बघायला मिळते!”  यामुळे मराठी इंडस्ट्रीत प्रचंड खळबळ माजली, सगळीकडूनच टीका व्हायला लागली,  कित्येक मराठी कलाकारांनी सुजयचं समर्थन केलं तर काहींनी सडकून टीका केली.

आता पुन्हा एकदा हाच विषय सोशल मिडीयावर चर्चेला आलाय. याला कारण झालाय  कन्नड अभिनेता चेतन कुमार. आपल्या सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर त्याने एक व्हीडियो शेयर केला आणि त्यात ब्राम्हणवाद आपल्याला मुळासकट उखडून काढायला हवा, अस स्पष्ट मत व्यक्त केले.  सोशल मीडियावर एकी व्हीडिओद्वारे त्यांनी म्हंटलं की – “ब्राम्हणवादाने फक्त आणि फक्त बसवेश्वर आणि बुद्ध यांचे विचार संपवण्याचे काम केले!” तसेच ” स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचा स्वीकार ब्राम्हणवाद कधीच करत नाही, सगळेच जण समान पद्धतीने जन्म घेतात त्यामुळे फक्त ब्राह्मण सर्वोच्च आहेत बाकीचे अस्पृश्य आहेत असं म्हणणं योग्य नव्हे, आपण मुळासकट हा ब्राम्हणवाद उखडून काढला पाहिजे.” असं ट्वीटही केले आहे. 

  अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याला समर्थन दिलं आहे,  कन्नड चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या कलाकाराने ब्राम्हणवादाच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर अनेक क्षेत्रातील भारतीयांचा त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला, पण चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. चेतन यांच्या वक्तव्याला आणखीन एक कन्नड अभिनेते उपेंद्र यांनी पुष्टी दिली, त्यांच्याही मते या सगळ्या प्रॉब्लेमच्या मागे ब्राम्हणवाद हाच कारणीभूत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.या दोन्ही अभिनेत्यांच्या या स्टेटमेंटमुळे सध्या बरीच चर्चा सोशलमीडियावर रंगताना दिसत आहे.तर आमची टीका ब्राम्हणांवर नसून ब्राम्हणवादावर आहे असंही स्पष्टीकरण चेतन यांनी दिलं,  

कन्नड चित्रपटसृष्टी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणं टाळते आणि या अशाच परिस्थितीत चेतन यांनी भारतातील बहुजन वर्गासाठी उभं राहणं हे कितपत योग्य की अयोग्य यावर कोणताही कन्नड कलाकार भाष्य करायला तयार नाही.  पटकथा लेखक मंसोरे आणि कन्नड अभिनेत्री श्रुती हरिहरन यांनी मात्र चेतन यांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा दर्शवला आहे. मंसोरे यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांच्या इंडस्ट्रीत कोणाला भांडणात रस घ्यायला आवडत नाही, मग ती metoo movement असो किंवा आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांचे प्रश्न! श्रुती हरीहरन या अभिनेत्रीने तर पैसा प्रसिद्धीसाठी हे सगळं करणाऱ्यांपैकी चेतन नाहीत असं सांगून त्यांची एक वेगळीच बाजू लोकांसमोर मांडली आहे. या दोघांच्याही मते चेतन यांनी ब्राम्हण लोकांवर टीका केलेली नसून ब्राम्हणवादाने चित्रपटसृष्टीत कशी पाळंमुळं रोवली यावर टीका केली आहे. ही दोघं सोडली आर साऱ्या कन्नड इंडस्ट्रीने यावर मौन पाळलेलं आपल्याला दिसून येईल.

ब्राम्हण डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष आणि इतर काही संस्थांनी चेतन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, चेतन हा एक “ओव्हरसीझ नागरिक” असल्याकारणाने त्याला पुन्हा अमेरिकेत धाडावे अशी मागणी केली आहे.

अमेरिकेत जन्म आणि शिक्षण घेतलेले ३७ वर्षीय चेतन यांनी २००७ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २०१३ सालचा त्यांच्या ‘मायना’ या सिनेमाचं कौतुक झालं. महेश बाबू यांनी दिग्दर्शित केलेल्या एका सिनेमात चेतन यांनी काम केले आहे.  चेतन कुमार यांना चेतन अहिंसा या नावानेदेखील ओळखलं जातं,  सामाजिक जाण असलेले चेतन हे सामाजिक कार्यातसुद्धा तितकेच मग्न होते, चेतन यांचा चेहरा अजूनही तितका लोकप्रिय नाही, ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जास्त ओळखले जातात असं पटकथालेखक मंजुनाथ रेड्डी उर्फ मंसोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

चेतन हे एक ओव्हरसीज सिटीजन असल्या कारणाने ते अशा कोणत्याही चळवळीत भाग घेऊ शकत नाही असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच त्यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली गेली आहे! यानंतर तातडीने चेतन यांना समन धडण्यात आले आणि Basavanagudi police station इथे त्यांची तब्बल ३ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण न झाल्याने ऑफिसर्सनी याविषयी काही सांगण्यास नकार दिला, चेतन यांचा जवाब नोंदवला गेला असून तिथून बाहेर पडताच चेतन यांनी एक ट्विट करत याबद्दलची खदखद व्यक्त केली. आपण सत्याच्या बाजूने बोलतोय त्यामुळेच आपल्यावर हे दडपशाही लादली जात आहे असा आरोप त्यांनी या ट्विटमधून केला आहे. 

मात्र चेतन यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला हा वाद आणखीन कोणतं वळण घेणार आहे याबाबत कोणीही बोलत नाही , पण एकंदरच कलाविश्वातल्या लोकांमध्ये असलेली ही अढी घातक आहे हे नक्की. गेल्यावर्षी सुजय डहाकेने या विषयाला वाचा फोडली तर आता कन्नड कलाकारांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरलाय. जात, पात, धर्म, रंग असा भेदभाव न करता समाजाला प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कलक्षेत्रात इतकी कटुता नेमकी का यावी? हे सगळं खरंच आहे की यामागेही कोणतं षडयंत्र आहे? हे येणारा काळच ठरवेल!


हे पण वाचा:- ब्राम्हण अभिनेत्रींनाच मराठी मालिकेमध्ये संधी मिळते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA