जगातील ५० टक्के जंगलसंपदा नेस्तनाबुत ?

  आज जगात पाणी हा महत्वाचा घटक आहे.कारण जल नहीं तो कुछ नहीं! पृथ्वीतलावर मानवजातीच्या अतीरेकामुळे आज निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे.अन्न, वस्त्र, निवारा याची मुख्य जड पाणी आहे.कारण पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्यच नाही.भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी पाण्याचा हा!हा!कार! होतांना आपण पाहतो.आजही अनेक देश पाण्यासाठी कडवी झुंज देत आहे. आज आपण कुठेही गेलो तरी पाणी अती आवश्यक आहे.आकाश-पाताळ,पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिन म्हणजेच आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मानव, पशु-पक्षी,जिवजंतु हे पाण्याविना जगुच शकत नाही.पाण्याविना निसर्ग नाही व मानवही नाही.म्हणजेच आज पाणी सर्वांसाठीच अनमोल आहे.त्यामुळे पाण्याचे महत्व सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे.

१९९२ ला पर्यावरण व विकास या विषयावर संयुक्त राष्ट्र संमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळेस विश्र्व जल दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली व संयुक्त राष्ट्र संघानेने प्रत्येक वर्षी २२ मार्चला विश्व जल दिवस साजरा करण्याचे जाहीर केले.यानंत १९९३ मध्ये २२ मार्चला संपूर्ण जगात विश्र्व जल दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला.यावेळेस जल संरक्षण आणि रख-रखाव यावर जनजागृतीचे मोठे अभियान छेडण्यात आले.विश्व जल दिवसाला पाणी वाचविण्याचा "संकल्प" दिवस सुध्दा म्हटल्या जाते.या दिवसाला पाणी संरक्षणा विषयी  जागृगता व पाण्याचे महत्व याला जास्त महत्त्व दिले जाते.आज मानवाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे पाणी आहे.कारण पाण्याविना संपूर्ण सृष्टीअधुरी आहे.आपण जगाच्या भुभागाचा विचार केला तर या पृथ्वीतलावर ७० टक्के पाणी व ३० टक्के भुभाग आहे.तरीही जगात पीण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते.कारण ७० टक्के समुद्राचे पाणी खारे असल्यामुळे पीण्यायोग्य नाही.

सध्या संपूर्ण जग अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करतांना दिसते.त्यामुळे जगात अनेक नवीन नवीन समस्या उदयास येतांना दिसतात.त्यामुळे आज संपूर्ण जगात पीण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.याचे मुख्य कारण म्हणजे जगातील वाढती लोकसंख्या यामुळे जगातील ५० टक्के जंगलसंपदा मानवाच्या अतिरेकामुळे नस्तनाबुत झाली आहे.त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता ते सरळ समुद्रात जात आहे.यामुळे आज जगात अत्यंत गंभीर समस्या निर्माण होऊन दिवसेंदिवस समुद्राची पातळी वाढत आहे.समुद्राची पातळी  वाढने म्हणजेच पृथ्वीतलावरील संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत धोक्याची घंटा आहे.त्यामुळे पाण्याचा विषय साधा नसुन अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.आज संपूर्ण जगात पीण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे.जगात वाढते कारखाने व अनेक परमाणु परिक्षण यामुळे निसर्गानचे संतुलन डगमगतांना दिसत आहे.कारखाण्यांच्या दुषीत वातावरणामुळे अनेक हिमकडे कोसळताना आपण पहातो.यामुळे संपूर्ण जगात महाप्रलय, सुनामी आल्याचेसुध्दा आपणासर्वांना ग्यात आहे.

जगातील हिमकडे साबुत रहाले तर पाण्याची समस्या आपोआप कमी होईल.परंतु मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी हिमकड्यांचा बळी घेतांना दिसत आहे.अनेकदा देवभुमित आलेला महाप्रलय हा हिमकडा कोसळल्याने आलेला महाप्रलय आहे.संपुर्ण भारतात 80 टक्के पीण्यायोग्य पाणी हिमकड्यातुन मीळत असते.परंतु मानवाच्या अतीरेकामुळे हिमकडे वेळेच्या आधी वितळायला लागले तर या पृथ्वीतलावर  20 वर्षांनंतर पीण्याकरीता एक थेंब सुध्दा पाणी मिळणार नाही.त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी तळागाळातुन प्रयत्न व्हायलाच पाहिजे.आज जंगलातील संपूर्ण हिंसक पशु शहरांकडे का येत आहे.याचा विचार कोणीच करीत नाही.परंतु जगातील संपूर्ण मानवजातीने हे लक्षात ठेवले पाहिजे की.जंगलातील हिंसक पशु-पक्षी शहरात येत नसुन आपण त्यांच्या घरावर म्हणजेच जंगलावर अतिक्रमण करीत आहोत.त्यामुळे जंगलातील पशु-पक्षी शहरात व गावात येतांना दिसतात.पुर्वी छोटे-छोटे तलाव असायचे.परंतु आज पुर्विचे छोटे-छोटे तलाव वस्ती व कारखाण्यामध्ये परीवर्तीत झालेले दिसुन येतात.त्यामुळे आज गावात, शहरात,वस्तीत संपूर्ण ठिकाणी पीण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतांना दिसून येते.याचे मुख्य कारण म्हणजे मानवाने निसर्गावर केलेला अत्याचार होय.

सध्याच्या काळात जगामध्ये आगजनीच्या घटना व वनवेलागने मोठ्या प्रमाणात दिसून येतात.अनेक मोठमोठी जंगले अजुनही जळत आहे.कारण मानवाने जमीनीच्या पोटातील पाणी संपूर्णतः निचोडुन(आटवुन)टाकले आहे.जगातील अनेक भागात ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतांना आपण पहातो.भुकंप, सुनामी ह्या संपूर्ण घटना पृथ्वीतलावर पाण्याची पातळी कमी होत असल्याने होत आहे.कारण जंगलसंपदा टीकुन रहाली असती तर पाण्याची समस्या मुळातच रहालीच नसती.पाणी टीकुन रहाले असते तर ज्वालामुखी, सुनामी, महाप्रलय,भुकंप,वनवे लागने इत्यादी विनाशकारी घटनांचा उद्रेक झाला नसता.अजुनही मानवजाती पाण्याचे महत्व समजल्याचे दिसून येत नाही.पुर्वी नदी,ओढे,तलाव,झिरा व विहिरीतून पाणी घ्यायचे परंतु आता नदी,तलाव व विहिरी आटुलागल्या आहेत.विहीरीची खोली 50 ते 60 फुटांपर्यंत असायची परंतु पाण्याचा दुष्काळ पहाता 50 ते 60 फुटांपर्यंतचे विहिरीचेसुध्दा पाणी आटल्याचे दिसून येते.त्यामुळे आता मानवजातीने बोरवेलचा सहारा घेऊन 500 ते 700 फुटांवर पाण्यासाठी जावे लागत आहे.

मनुष्याला पाण्याचा अधिकार फक्त 50 ते 60 फुटांपर्यंतच होता.परंतु मानवाने पाण्यासाठी संपूर्ण सीमा ओलांडून पाताळात जाऊन तेथील पाण्यावर अतीक्रमन केल्याचे दिसून येते. म्हणजेच मानवाने सापाच्या बिळात हात टाकला आहे.ज्या पाण्यावर मानवजातीचा तिळमात्र अधिकार नाही तेही पाणी आपण आपली तहान भागवण्यासाठी वापरीत आहोत.हा मानवाचा निसर्गसृष्टीवर खुला अन्याय व अत्याचार नाही काय?आज मानवाच्या निष्काळजीपणामुळे व अतिरेकामुळे जंगले वाळुन (सुकली)गेली आहे.आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसले आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.अनेक देशात गृहयुद्ध सुरू आहे.उदाहरण द्यायचे झाले तर अझरबैजान-आर्मेनिया,खाडी युद्ध, अफगाणिस्तान,इराण-इराक संघर्ष आणि आता रशिया -युक्रेन युद्धाने जनुकाय रक्ताची नदि वाहत आहे की काय असे वाटत आहे.यामुळे युक्रेनमध्ये आगेचा लोंढा दीसत होता.त्याचप्रमाणे अनेक देश परमाणुपरीक्षण करतांना आपण पहातो.अशा परीस्थितीत भुमाता(पृथ्वी) पाण्याचे संग्रहन कसे काय करेल? 

मानव आज आगीशी खेळत आहे त्यामुळे तो पाण्याचे महत्व विसरल्याचे दिसून येते.त्यामुळे संपूर्ण जगाने पाणी वाचवीण्याचा संकल्प करायला पाहिजे.अन्न,वस्त्र,निवारा आवश्यक आहे यात दुमत नाही.परंतु अन्न,वस्त्र, निवारा यांची उत्पत्ती ही पाण्यापासूनच होत असते.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाने 22 मार्चला विश्व जल दिवस साजरा करतांना पाण्याचे महत्व समजुन घेतले पाहिजे.जगापुढे शुद्ध पाण्याची गंभीर समस्या आहे.पाण्यासाठी अनेक देशांमध्ये हा!हा!कार! माजल्याचे दिसून येते.त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी भारतासह संपूर्ण जगाने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.पर्यावयण व निसर्ग सुरक्षित तर पाणी सुरक्षित.पाणी सुरक्षित तर मानव, पशुपक्षी,जीव-जंतु सुरक्षित,जिव सृष्टी सुरक्षित तर पृथ्वी सुरक्षित ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे.आज अनेक देशांतील जंगल संपदा नस्तनाबुत करून कारखाने,शहरे मोठ्या प्रमाणात उभारले आहे.त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जंगलातील हिंसक प्राणी (वाघ,अस्वल,सिंह,कोल्हा, बिबट्या, जहरीले साप) शहरात शिरकाव करतांना दिसतात.यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी सुध्दा झाली आहे.याचे मुख्य कारण म्हणजे जंगलातील पाण्याचा तुटवडा होय.

आज पाण्यासाठी मानव व प्राणी एकमेकांचे कट्टर शत्रृ बनल्याचे दिसून येते.त्यामुळे संपूर्ण जगाने पाणी वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे.असे भाकीत आहे की 2040  मध्ये भारतात प्यायला पाणी मिळणार नाही.अशी स्थिती येवू शकते याला नाकारता येत नाही.संयुक्त राष्ट्राने जगातील पाण्याच्या परीस्थितीच्या अहवालामध्ये ही भीती वर्तवली आहे.जगात पुढे पाण्याचे भिषन संकट येणार असून भारत या संकटाच्या केंद्रस्थानी रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नद्या, सरोवर, तलाव यामध्ये उपलब्ध असलेले पीण्याचे पाणी झपाट्याने प्रदुषित होत आहे.त्यामुळे कारखान्याचे दुषीतपाणी व सांडपाणी यांना पीण्याच्या पाण्यापासून कोसो दूर ठेवण्याची गरज आहे.दुषीत पाणी पील्यामुळे जगात दरवर्षी लाखोच्या संख्येने मानवीय हाणी व पशुपक्षांची हाणी मोठ्या प्रमाणात होतांना दिसुन येते यालाही थांबविण्याची गरज आहे.एकावर्षात पडलेले पावसाचे पाणी अडवीता आले तर पाच वर्षे पुरेल इतका पाणी साठा आपल्याला उपलब्ध होवू शकतो.परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे अजुनही आपल्याला जमले नाही.आताही 80 टक्के पाणी प्रदूषित आहे.

पाण्याच्या स्त्रोतांचे होणारे प्रदुषण आणि पाणी साठविण्यासाठी नसलेले नियोजन हे दोन प्रश्न आहेत.यावर दुर्लक्ष सुरूच राहील्यास येणाऱ्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकते असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांचे दिला आहे.मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे त्यामुळे हे लक्षात ठेवले पाहिजे की पाणी संपले तर आपण संपु,आपण संपलो तर जग संपेल! त्यामुळे विश्र्व जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकांनी पाणी वाचविण्याचा "संकल्प"केला पाहिजे.तेव्हाच पाणी वाचेल.त्याचप्रमाणे "पाणी वाचवा देश वाचवा" हा निर्धार संपूर्ण जगाने अंगीकारला पाहिजे.आज जगातील वाढती पाण्याची समस्या यामुळे अनेक पशुपक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते.याकरीता जल विश्र्व दिनाच्या निमित्ताने वाढते प्रदुषण रोखण्याचा व पाणी वाचविण्याचा निर्धार सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.                        .                                  

रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)   मो.नं.9921690779, नागपूर

----------------------------------


नागपूर - कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना फटका बसला. मग यातून जलसंधारणाच्या कामे का होईना त्यालाही खीळ बसली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामाकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच ज्या पद्धतीने इतर क्षेत्र हळूहळू रुळावर येत गती पकडली आहे. त्याच पद्धतीने पाणी क्षेत्रातही काम होण्याची गरज आहे. 22 मार्च हा सर्वत्र जागतिक जल दिन मानला जाते, यानिमित्ताने महाराष्ट्र जल भूषण पुरस्कार प्राप्त तसेच जल अभ्यासक प्रवीण महाजन बोलत होते. तसेच वर्ध्याच्या वैद्यकीय जनजगृती मंचाच्यावतीने जलसंधारणाच्या कामाला आता पुन्हा पूर्वरत करण्यासाठी चळवळ सक्रिय करण्याची गरज असल्याचे डॉ. सचिन पावडे सांगतात. जल अभ्यासक प्रवीण महाजन यांची प्रतिक्रियाकाही ठिकाणी "धरण उश्याला कोरडं घशाला" परिस्थिती -कोरोना काळात घरात लॉकडाऊन असले, तरी पाऊस समाधानकारक झाल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. पण पाणी टंचाई आज नाही असे नाही. कारण आजही महाराष्ट्रातील अनके जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्रातील कामे रखडली आहे. यामुळेच धरण उशाला आणि कोरड घश्याला अशी परिस्थिती आहे. आज शहर असो की ग्रामीण भागात नियमित पाणी पुरवठा होऊ शकत नाही. धरणात पाणी साठा असला तरी त्याला शहर आणि ग्रामीण भागात ग्रामपंचयात स्तरावर पोहचण्यासाठी पाहिजे त्या यंत्रणा सक्षम नाही त्यामुळे ही परिस्थिती असल्याचे प्रविण महाजन म्हणालेत. धरणाच्या पाण्यात पहिला वाटा हा पिण्याच्या पाण्यासाठीच असतो. धरणापासून दोनशे तीनशे किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकून ते पाणी तहानलेल्या जिवाणपर्यंत पोहच नसल्याने पाणी टंचाईला समोर जावे लागते. त्यामुळे पाणी पोहचवणाऱ्या यंत्रणा सक्षम झाल्यास याच फायदा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही प्रमाणात नक्कीच होऊ शकतो. पाणी फाऊंडेशन प्रमाणे अनेक संस्था काम करत आहेत. या संस्थांना सोबत घेऊन जल विभागाने काम केल्यास या चळवळीला आणखी मोठं स्वरूप प्राप्त होऊन चळवळ उभी राहू शकेल असे प्रविण महाजन सांगतात.Jal Hi Jeevan Mishanजलसंधारणाचे काम करताना नागरिकपाणी फाउंडेशनच्याच्या माध्यमातून चळवळ उभी राहिली -प्रसिद्ध अभिनेता अमीर खान ( Famous actor Aamir Khan ) यांच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव खेड्यात पाणी जमिनीत मूरवण्यासाठी चळवळ उभी राहिली. लाखो लिटर पाणी जमिनीत मूरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामेही झाली. यातच वर्ध्याच्या वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने डॉक्टरांनी शारीरिक रोग्याबरोवर पाणी टंचाई दूर करण्यासाठी जमिनीवर उपचार करायला सुरुवात केली. शहरातील चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी स्वतः कुदळ पावडे घेऊन गावकऱ्यांमध्ये जाऊन कामे केली. श्रमदानातून जमिनीवर पडलेला घाम पावसाळ्यात पाणी पातळीत वाढ होण्यास फायद्याचा ठरला. तसेच शहरात काम करण्यासाठी पावसाळ्याचे पाणी जमीमित सोडण्यासाठी एक मोहीमही राबविला.थेट बोअरवेलच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी भूगर्भात सोडले -शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बोरवेलच्या माध्यमातून जमिनीच्या पोटातून हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. पण थेंबभर पाणी मात्र जमिनीत सोडत नसल्याची खंत वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे यांच्या मनात सलत होती. यासाठीच पावसाचे पाणी जमिनीत कसे सोडता येईल म्हणून एक यंत्र बनवले. या यंत्राचे पेटंट मिळवले आणि त्यानंतर या मोहिमेला सुरुवात झाली. वर्धा शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये सेमिनार घेऊन जनजागृती मोहीम राबवत पावसाचे पाणी थेट बोरवेल मध्ये सोडण्याच्या मोहिम उभी राहली. मागील दोन वर्षात कामे झाली नसली तरी जवळपास 1200 घरांवर हे यंत्र नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर लावून लाखो लिटर पाणी थेट 200 ते 300 फूट खाली जमिनीत सोडले. हेच पाणी नैसर्गिक पद्धतीने इतक्या खोलीवर जाण्यासाठी शेकडो वर्ष निघून जातात. साधारण 1 हजार चौरसफूट टेरेसवर पडणारा सरासरी पाऊस पाहता 90 हजार लिटर पाणी जमिनीत सोडले जाते. यावरून याची व्याप्ती लक्षात घेऊन पुन्हा याच पद्धतीची चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचेही सचिन पावडे सांगतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1