व्यास क्रिएशन्स्च्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचे शानदार उदघाटन

ठाणे- वाचन हा उत्तम संस्कार आहे, तो पुस्तकांच्या रूपाने जपला जातो. पुस्तकांचे आदान प्रदान म्हणजे विचारांची देवाण घेवाण असते. आपला समाज चांगल्या विचारांनी, उत्तम संस्कारानी समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचे आदान प्रदान महत्त्वाचे आहे. गेली ३ वर्षे सुरु असलेला हा महोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वातावरणात भर घालणारा आहे.  असे गौरवोद्गार ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी काढले.  तीन दिवस सुरु असलेल्या व्यास क्रिएशन्स्च्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ रंगकर्मी पदमश्री नयना आपटे आणि विजय गोखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


 सहयोग मंदिर येथे या महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. 

आपण वाचलेले आणि संग्रही असलेले  पुस्तक दान करा आणि तुम्हाला आवडेल ते पुस्तक घेऊन जा या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात तीन दिवस जवळपास २५ हजार हुन अधिक पुस्तकांचे आदानप्रदान होईल असा विश्वास  व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी व्यक्त केला. 

यावेळी पदमश्री नयना आपटे आणि विजय गोखले यांची प्रकट मुलाखत वृंदा दाभोलकर यांनी घेतली. दोन्ही कलाकारांनी आपल्या नाट्यकलेचा प्रवास मांडला. वाचनाचे महत्त्व आणि बालपणापासून झालेला संस्कार यामुळेच हा प्रवास सुखकर झाल्याचे त्यांनी सांगितले. 

रामदास खरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या