ओमायक्रॉन व्हेरिएंट- मात्र अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास झालेला नाही

  जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळें भितीचे वातावरण निर्माण होत आहें. मात्र अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास झालेला नसल्याने शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत.  लसीकरणामुळे सध्या मास्क घालण्याकडें दुर्लक्ष होत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे मत राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य  डॉ.व्हि.के.पॉल यांनी व्यक्त केले. आज आरोग्य विभागाच्या वतीने  घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारतात मास्क घालण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कीं लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. आपण जागतिक परिस्थितींपासून शिकायला हवं अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी देशवासीयांना मास्क घालण्याचे आवाहन केले. ओमायक्रॉनमुळे जगभर चिंता व्यक्‍त केली जात असत्ताना सध्या अस्तित्वात असलेल्या लसी त्यावर प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहें. त्यावर डॉ. पॉल म्हणाले, सध्याच्या लसी करोनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील. कोरोनाचे व्हेरिएंट अजून इत्तके स्मार्ट झालेले नाहीत की ते लसीमुळे तयार झालेनं सुरक्षा कवच भेदू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या