ठाणे :- 6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिनी देश-विदेशातून आंबेडकर प्रेमी जनता अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीला येत असते. या दिवशी सर्वदूरहून येणाऱ्या आंबेडकरी जनतेला मुंबईत येत असताना रेल्वे प्रवासात कुठलाही अडथळा येऊ नये, यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना नेहमी साथ देत असते, यावेळेस देखील याबाबत विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बैठकीचे प्रमुख डोंबिवली रेल्वे स्टेशनचे पीएसआय ए. व्ही. सोनार, पीएसआय एस एन तडवी, एसआय साळवे, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे, सल्लागार अमोल कदम, माया गुरव, संगीता मोरे, सुनीता शहा, नीलम पाटील, स्नेहलता गवरे, राखी मोकल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे, महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, कुठलाही अडथळा येऊ नये, याकरिता पोलिसांच्या मदतीला प्रवासी संघटनेची मदत आवश्यक असते, तसेच पोलीस बंदोबस्तासोबत कोरोना महामारी आणि प्रवाशांची सुरक्षितता याबाबत जनजागृती देखील डोंबिवली लोहमार्गातील रेल्वे स्थानक परिसरात करण्यात येणार असल्याचे पीएसआय एस. एन. तडवी यांनी सांगितले.
मागील कित्येक वर्षापासून लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे पदाधिकारी पोलिसांना वेळीच मदत करत असतात असे महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यानी बैठकीत सांगितले.
0 टिप्पण्या