त्यामुळेच भाजपचे नेते आणि मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत

 पाच वर्षापूर्दी आजच्याच दिवशी अविचारीपणे निर्णय घेऊन हुकुमशंहाप्रमाणे देशावर नोटबंदी लादली. त्या काळा दिवसाला आज ५ वर्ष झाली.  निर्णय घेताना नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहषतवाद, नक्षलवाद, बनावट चलनी नोटा संपतील अशा धापा मारून देशाची दिशाभूल केली होती. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे उद्योग व्यवसाय छोटें व्यापारी आणि रोजगार संपले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्याचे आपण सर्व पहात आहोत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. देशाचा जीडीपी निचांकी पातळीवर पोहोचला. अनौपचारीक क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले. मोदी यांनी या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावें अशी मागणी काँग्रेंस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली

पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे घेततेत्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले, कोट्यावधी लोक बेरोजगार झालें आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नोटाबंदी ही संघटीत लूट असून यामुळे जीडीपीत मोठी घसरण होईल हे आता सिद्ध झाले आहे.  नोटाबंदीमुळे देशातील जनतेला प्रचंल हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्यावेळी मोंदी म्हणाले होतें की ५० दिवसांत सारे काही आलबेल होईल. त्याला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही. नोटाबंदीचे जे उद्देश पंतप्रधानांनी सांगितले होते त्यातला एकही सफल झाला नाही. उलट अर्थव्यवस्था रसातळाला गेली आते. त्यामुळेच भाजपचे नेते आणि मोदी आता याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. देशात काहीही चांगले झालें की आपल्यामुळेच झाले असे सांगून प्रत्येक गोष्टींचे भांलवल करून श्रेय लाटणा-या मोदींनी आपल्या घोडचुकीबदल देशाच्या जनत्तेची माफी मागावी असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA