अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३००० हजार किलो अंमली पदार्थाचे काय झाले

 काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सरकारविरोधात जनजागरण अभियान

मुंबईः   कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमली पदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे.  असा आरोप एनसीबीच्या कारवायांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणज “दाल मे कुछ काला है...' असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला  एनसीबीने अटक केली त्याला हिंदु मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत


 टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय कॉँग्रस कमेटीचे सचिव व राज्य प्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, आ. शिरीष चौधरी, चारुलता टोकस, संजय राठोड, भा. ई. नगराळे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस आ. धीरज देशगुख, देशमुख, आ. राजेश राठोड, अभिजीत देवानंद पवार,  प्रमोद मोरे, डॉ. राजू यांच्यासह आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली पण सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या भाजपच्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून  राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी 'जेलभरो' आंदोलन करणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.

 या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व्‌ राज्यात भाजपाने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चिड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे व सोनियाजी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्या - जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA