Top Post Ad

शहापूर तालुक्यातील २५ शाळांना उडण्यासाठी मिळणार पंख नवे


शहापूर : दळखण येथील भक्तीसंगम विद्यालयाची स्थापना १९९६ साली झाली, असून ज्ञानदानाचे हे कार्य गेले २५ वर्षे अव्याहत चालू आहे. परंतु २०० विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळेला काळानुरूप डागडुजी करण्याची गरज होती. ही गरज ओळखून जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने "रूफ टू ड्रीम" या प्रकल्पातून शाळेचे गळणारे छत बदलून नवे पत्रे बसवले व रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे दळखण येथील भक्तीसंगम विद्यालयाला नवसंजीवनी मिळाली आहे. शहापूर तालुक्यातील अनेक शाळेच्या इमारती गेली अनेक दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविताना स्वतः मात्र जीर्ण झाल्या आहेत.

 विशेषतः पावसाळ्यात या शाळांच्या इमारती गळतात व विद्यार्थ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागते. अशा शाळांच्या छतांच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम "रूफ टू ड्रीम" या प्रकल्पांतर्गत जेएसडब्ल्यू फाऊंडेशन द्वारे हाती घेण्यात आला आहे. भक्तीसंगम विद्यालयाच्या नूतनीकरण झालेली ईमारतीचा हस्तांतरण सोहळा बुधवारी आमदार दौलत दरोडा यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी शहापूर विधान सभा क्षेत्र आमदार दरोडा, जेएसडब्ल्यू कंपनीचे प्लांट हेड राजेश जैन, जनसंपर्क अधिकारी चिन्मय पालेकर, अमित भूरचंदी तसेच शाळेचे संचालक कृष्णकांत देहरकर, काशीनाथ तिसरे, शंकर खाडे, निळू खरे, दत्तात्रय भेरे व शिक्षकवृंद उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना आमदार दरोडा यांनी व संचालक मंडळाने कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच जेएसडब्ल्यू कंपनी प्लांट हेड राजेश जैन यांनी कंपनीकडून आज पर्यंत तीन शाळेतील व दोन अंगणवाडीतील एकूण २३ वर्ग खोल्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून पुढे अजून २० शाळांमधील छतांचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com