याबाबत विचार केल्यास हे जिल्हाधिकार्यांचे काम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत असते. म्हणून आमची मागणी आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पुढील वर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीववर ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
0 टिप्पण्या