Top Post Ad

..... पण निर्लज्जपणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत

आंबेप्रकरणाने प्रसिद्ध झालेले आणि भीमाकोरेगाव दंगलीत आरोप करण्यात आलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असे वक्तव्य त्यांनी केले. आपला देश जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? पण आपण तो मिळवला आहे. आपला कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येत पुढे आहे, त्यामुळे ते आपल्याला जमलेले नाही. पण निर्लज्जपणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत' असे स्पष्ट मत भिडे यांनी व्यक्त केले आहे.

 जगाच्या पाठीवर 187 राष्ट्रे आहेत. त्या राष्ट्रामध्ये पारतंत्र्य, गुलामी दास्याच्या ननरकात राहण्याचा बेशरमपणाचा वाटत नाही, लाज वाटत नाही अशा 123 कोटी लोकांचा देश जगामध्ये आहे. प्रदीर्घ काळ, परक्यांचा मार खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान असे वक्तव्य देखील भिडेंनी केले आहे  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून दसऱ्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे राज्यकर्त्यांवर आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकले आहेत. जसे सोन्याच्या हरणाची भुरळ प्रभू रामचंद्रांना पडली आणि आपला विवेक राम हरवून बसले आणि त्या सोन्याच्या हरणाची शिकार करायला गेले, पुढे सीतेचे अपहरण झाले, तसे आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी,मेंदू विकारवश झाले आहेत, त्यामुळेच तर दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी दिली नाही.

पण लॉकडाऊन झाल्यानंतर हेच राज्यकर्ते 21 व्या दिवशी महसूल वाढतो म्हणून राज्यभरातील दारूची दुकाने उघडी ठेवा म्हणून सांगतात आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालतात, ते राज्यकर्ते बेशरम, नालायक असल्याचे म्हणत भिडेनी सरकारवर टीका केली आहे. दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलताना संभाजी भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुन्हा एकदा कोरोनावर बोलताना भिडे यांनी चीनवर टीकेची झोड उठवली. कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. कोरोना थोतांड असल्याचे भिडे म्हणाले.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com