
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये याबाबत गुरुवारी झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली. ओबीसी आरक्षण व पूरग्रस्तांसाठी मदतीवर सुमारे दीड तास चर्चा झाली ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका नकोत, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. कोविडच्या उत्तम उपाययोजनांमुळे आघाडी सरकारची प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात अर्थ नाही. मात्र ६ महिन्यांत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाही. त्यामुळे सर्वमान्य तोडगा काढून या निवडणुका वेळेत घ्याव्यात, अशी चर्चा महाआघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच झाली.
जिथे ओबीसी उमेदवार होते, तेथे आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार द्यावा, जेणेकरून ओबीसींच्या वाट्याच्या २७% जागा कायम राहतील. तसेच भाजपला याचे राजकारण करता येणार नाही, ओबीसींची जातनिहाय आकडेवारी केंद्राकडून मिळणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाकडून इतक्यात जमा करणे शक्य नाही, त्यामुळे ओबीसी उमेदवारांसाठी राखीव जागांवर ओबीसीच उमेदवार देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका वेळेत घेणे हिताचे राहील, असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले असल्याचे समजते.
0 टिप्पण्या