Top Post Ad

महानगरपालिका प्रशासनाच्या वेळकाढूपणा मुळे कामगारावर अन्याय

   मुंबई महानगरपालिका हे देशातील सर्वात मोठी आणि आदर्श महानगरपालिका म्हणून गौरवली जाते.अनेक तरुण १० वी , १२ वी, पदवीधर आणि अभियांत्रिकी डिप्लोमा व डिग्री प्राप्त असल्यावर ही विविध खात्यात कामगार म्हणून कामावर लागतात. भविष्यात त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या योग्य प्रमाणे काम मिळेल ही आशा त्यांना कायम असते. परंतु प्रशासनाच्या वेळकाढूपणा मुळे कामगारावर आज पर्यंत अन्यायच झाला आहे. असे अनेक कामगार खाजगीत बोलतात. महानगरपालिकेच्या घ.क.व्य. खात्यातील परिपत्रकानुसार (मु.पर्य./3130/घ.क.व्य./दि.25.08.2021) वाणिज्य, कला, विज्ञान, पदवीधर आणि अभियांत्रिकी डिप्लोमा व डिग्री प्राप्त कामगार वर्गाला कार्यालयीन काम करत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांना लिपिक म्हणून पद देण्याचा विचार मनपा करत आहे. या गोष्टी बाबत मनपालिकेचे खुप खुप अभिनंदन..

 निर्णय छान आहे पण लाभार्थी कामगार कमीच घेतले जातील आणि काही १० वी , १२ वी पास असलेल्या परंतु कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण कामगार कर्मचारी झाला तर त्यांचा मानसन्मान, प्रतिष्ठा वाढते,आज परिपत्रकाची पाहणी केली असता सद्य स्थितीत जे आज कार्यालयात काम करणारे कामगार नुकतेच नवीन आहेत. त्यांना लिपिक होण्याची संधी दिली जाणार आहे यांच्या साठी तर हे खुप छान आहे. पण जे कामगार या आदी उदारहरणार्थ 2005 पासून कार्यालयात काम करत आहेत मग त्यांचे शिक्षण 10 वी,12 वी असेल तर मग त्यांच्या विचार लिपिक म्हणून केला जाईल का...? यावर  स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनची शंका आहे.

 तसेच महापालिकेने दर दोन वर्षांनी खात्यांतर्गत लिपिक पदाची परीक्षा घेणे आवश्यक होते परंतु ती ५ ते ६ वर्षांनी आठवण होते तेव्हा घेण्याचे काम केले जाते. तेव्हा मान्यताप्राप्त युनियन का गप्प असतात असा प्रश्न कामगार,कर्मचाऱ्यांना पडत नाही. त्यामुळे 10 वी, 12 वी पास असलेल्या कर्मचाऱ्यांवर महापालिकेच्या दिरंगाईमुळे अन्याय झालेला असतो.त्याविरोधात आम्ही सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार केल्यावर थोडे वादळ उठले,त्यामुळे कामगार,कर्मचाऱ्यात जनजागृती झाली. खरं तर हे कामगार वरिष्ठानाच्या आदेशप्रमाणे खुप वर्ष आस्थापनातील काम करत आले आहेत. त्यांची तुलना कामगार म्हणूनच होते,कर्मचारी म्हणून नाही.पण आज त्यांच्या कामाचा कार्यकाल मोठा आहे.कामाचा अनुभव लिपिक वर्गासारखा आहे पण आजच्या तारखेला त्यांच पदवीधर (ग्र्याजुयेशन) नाही मग त्याच्यासाठी काय नियम असणार.... हे एक मत आहे.

 म्हणजे त्यांना परिपत्रकाच्या नियमात न बसण्यासारखं आहे किंवा त्यांना वगळण्यात येईल असं वाटत. कारण आजचा उच्च शिक्षित कामगार वर्ग हा आज प्रथम लिपिक पदास पात्र ठरेलं. यावर ठाम मत आहे की प्रथम परिपत्रकामध्ये असा एक कॉलम नमूद करायला हवा होता की ज्या कामगारांनी या पूर्वी कार्यालयात किती वर्ष काम केले आहे याचा कालावधी नमूद करणं अपेक्षित आहे. यावरून त्याच्या कामाचा आढावा घेता येईल.मग 2005 चा 10 वी व 12 वी वाला कामगार असेल किंवा आताचा पदवीधर (ग्र्याजुयेशन) किंवा डिप्लोमा केलेला कामगार वर्ग असेल त्यांना लिपिक पदाचा हक्क मिळेल. 

कारण 2005 या कालावधीपासून त्याचा कार्यकाल हा जास्त वर्ष आहे आणि त्याने ही प्रामाणिक पणे कार्यालयीन काम केले आहे त्याला अनुभव हा आलेला असतो. त्यामुळे तो 10 वी व 12 वी वाला कामगार असो किंवा पदवीधर (ग्रॅज्युयेशन) घेतलेला कामगार वर्ग असो तरी त्यांना न्याय मिळावा आणि तो मिळविण्यासाठी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनची मागणी आहे सन २०१६ पुर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना पुर्वीच्या लिपिक पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि सन २०१६ नंतर ज्यावेळी लिपिक पदाची शैक्षणिक अर्हता बदलण्यात आली त्या दिवसानंतर जे कोणी कर्मचारी महापालिकेच्या सेवेत लागले असतील त्यांनी नवीन शैक्षणिक अर्हतेनुसार लिपिक करण्यात यावे अशी मागणी नरेंद्र पवार सहसचिव स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 नरेंद्र पवार 
सह सचिव,- स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com