Top Post Ad

पूरग्रस्त सलून व्यवसायिकांना राष्ट्रीय जनसेवा पक्षाचा मदतीचा हात

  जुलै महिन्यातील अतिवृष्टी मुळे कोकणात महापूर आला होता, जीवित हानी सह मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते,कित्तेक बांधवांचे संसार उघड्यावर आले होते, नुकसानीचा आकडा एव्हढा मोठा होता की सरकारी आणि सामाजिक संस्थांची मदतही अपुरी पडत होती, याच वेळी सर्वात जास्त नुकसान सलून व्यवसायाचे झाले होते, सलूंनची दुकाने पाण्या खाली गेल्याने व्यवसायिक हवालदिल झाला होता, लॉक डाऊन काळात बेजार झालेला सलून व्यवसायिक कसाबसा उभारी धरत असतानाच हे महा संकट ओढवल्याने त्याच्या दुःखाला पारा वार राहिला नव्हता, मुबईतील सलून असोसिएशन सोडले तर त्यांच्या मदतीला कुणीही जात नव्हते, आजपर्यंत नाभिक समाज बांधवांचा वापर फक्त आणि फक्त मतदानासाठीच करून घेतला गेला, परंतू समाजाच्या भावना, सुखदुःख कोणीही वाटून घेतले नाही शासन कोणाचेही असो कोणीही या समाज बांधवांकडे डोकावून पाहिले नाही 

अशा नैसर्गीक, महाकाय परिस्थितीत कोकणातील राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे आमचे सन्मानीय रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष  दत्ताराम कदम साहेब यांनी सलून व्यवसायिकांना मदत करण्याची मगणी पक्षा कडे केली,  त्यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.महावीर गाडेकर साहेब यांनी सर्व सलून व्यवसायिकांना सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देण्याचे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांना केले,  पक्षाचे उपाध्यक्ष  संजय पंडित,सचिव  रमेश राऊत आणि खजिनदार  पोपटराव शिरसाठ यांनी या मदत कार्याचे स्वागत केले आणि सर्व पदाधिकारी बांधवांना तश्या सूचना दिल्या,  पक्षाच्या सर्वच पदाधिकारी बंधु भगिनींनी सढळ हस्ते मोलाची मदत करून अवघ्या एक महिन्यात मदतनिधी उभारण्यात आला, पुणे येथील ज्येष्ठ समाजसेविका रमाताई वाघमारे यांनी या कामी भरीव योगदान दिले,

तसेच पुणे येथील ख्यातनाम डॉक्टर आणि पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष  अरविंद झेंडे साहेब यांनी स्वखर्चाने या कार्यात विविध आजारांवर मोफत औषधे वाटप करण्याचा निर्णय घेतला, अशाप्रकारे सर् जमा झालेल्या सर्व निधीतून सलून व्यवसायिकांना सलून साहित्यांचे वाटप करण्यात आले, चिपळूण,खेड,महाड,बिरवाडी आणि पोलादपूर या भागातील सलून व्यवसायिकांना जवळ जवळ तीनशे कीटचे वाटप करण्यात आले,समाजबांधवांच्या व्यथा सहानुभूतीने समजून घेतल्या गेल्या आणि त्यांना मानसिक आधार देण्यात आला. राष्ट्रीय जनसेवा पक्ष नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे, लॉक डाऊन काळात देखील पक्षाच्या पदाधिकारी बांधवांनी विविध भागात अन्नधान्याचे वाटप करून समाज बांधवांना मोलाचा मदतीचा हाथ दिला होता,

 या मदत कार्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष भगवानराव शिंदे,पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश सल्लागार  अरुण कालेकर, उपाध्यक्ष डॉ.अरविंद झेंडे,प्रदेश संपर्क प्रमुख  गोपीनाथराव बिडवे, कैलासराव गायकवाड, दत्ता गोरे,  महिला आघाडी प्रमुख अलका ताई सोनवणे,संघटक वनिता ताई भालेकर, उपसंघटक सुरेखा ताई साळुंखे,बेबीताई कऱ्हेकर आणि सर्वच महिला पदाधिकारी  यांनी सादर कार्यक्रमात उपस्थित राहून विशेष सहकार्य केले.

कोकणातील या संपर्ण मदत कार्याचे नियोजन मा.अध्यक्ष गाडेकर साहेब,उपाध्यक्ष  संजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष  दत्ताराम कदम, महादेवराव चव्हाण, अरुण मोरे,विशाल राऊत,संदीप शिंदे, विशाल राऊत,अजित चव्हाण, सुरेश जाधव, अरुण शिंदेश्री सुरेश जाधव,किरण चव्हाण  विजय शिंदे, गौरव चव्हाण, रुपेश माने,महाड तालुक्याचे  बबन सकपाळ आणि कोकणातील सर्व पदाधिकारी बांधवांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी पक्षाध्यक्ष गाडेकर यांनी सर्व कोकण वासियांच्या धैर्याचे कौतुक करून धन्यवाद दिले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com