विधवेला मारहाण, सासरा, दिर आणि जाऊबाई यांचेवर गुन्हा दाखल

 विधवेवर सामुदायिकरित्या विनयभंग करून घातक हत्याराने मारहाण करणाऱ्या  सासरा, दिर आणि जाऊबाई यांचेवर गुन्हा दाखल ; एक अटक

     शहापूर -   तरुण विधवेवर समुदायिकरित्या विनयभंग करून घातक हत्याराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरा, दिर आणि जाऊबाई यांचेवर रविवारी २९-ऑगस्ट २०२१ रोजी  वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी सुधीर महाजन यास अटक करून कोर्टात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दिली.

शहापूर तालुक्यातील वासिंद पूर्व स्वामी विवेकानंदनगर येथे राहणाऱ्या संगीता सुहास महाजन (३६) असे त्या तरुण विधवेचे नाव आहे.  २०११ मध्ये संगीताचा विवाह स्वामी विवेकानंदनगर वासिंद पूर्व येथील सुहास महाजन यांच्याशी झाला होता. ऑक्टोबर २०२० रोजी सुहासचे निधन झाले. तेव्हा पासून संगीता व तिचा मुलगा मानस (८) सह सासरीच राहत आहेत. मात्र  पतीच्या निधनानंतर सासरच्यांनी संगीताचा शाररिक व मानसिक छळ करणे सुरू आहे. तरुण विधवा व सासरची मंडळी हे जेवण वेगवेगळे बनवत असून शनिवारी (दि.२८)  संध्याकाळी गॅस संपल्याने संगीताने शेजाऱ्यांकडून गॅस सिलेंडर घेतला व माहेरहून आणलेले भांडे स्वयंपाकासाठी घेतली असता  संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास संगीताचा दिर सुधीर महाजन संगीता जवळ आला आणि  संगीताचा हात पकडून तिचा गाऊन फाडून तिच्या शरीरास मिठी मारून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असतांना संगीता ओरडल्याने तिचा सासरा काशीनाथ महाजन व जाऊ रुपाली महाजन तिथे येऊन या तिघांनी तिच्या पोटात, छातीत लाथ मारत ठोशा बुक्क्यांनी मारहाण करत संगीताच्या डोक्यात, पाठीत गॅस रेग्युलेटर आणि भांड्याने दुखापत करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारी धावून आले आणि त्यांनी सुनीताची सुटका केली असता रक्तबंबाळ अवस्थेत संगीताने पोलीस स्टेशन गाठले असता पोलीसांनी तिला पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येथे दाखल केले होते. 

रविवारी संगीताच्या तक्रारीवरून वासिंद पोलीसांनी संगीताचे सासरे काशीनाथ महाजन, दिर सुधीर महाजन आणि जाऊ रुपाली सुधीर महाजन यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० कलम ३५४, ३२३,३२४,५०४,५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी सुधीर महाजन यास अटक करून कोर्टात दाखल करण्यात आले आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रभागा पवार करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या