ठाणे: भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने रविवार दिनांक २६ सप्टेंबर, २०२१ रोजी "ठाणे फ्रिडम सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने आयोजित या ठाणे फ्रिडम सायक्लोथॉनमध्ये शहरातील इपिक राईडर्स, सायकल युग, ग्रोईंग किड्स व आम्ही सायकल प्रेमी आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे. या सायकल रॅलीचे उदघाटन महापालिका मुख्यालय येथे महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते यांच्या संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते .अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, उप महापौर सौ. पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त (१) तथा ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे तसेच इतर सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका आदी उपस्थित राहणार आहेत.
दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ६.३० ते सकाळी ११.३० या वेळेत "ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन हे ७५ किमीचे ठाणे(ठाणे महापालिका मुख्यालय) ते गेट वे ऑफ इंडिया आणि परत ठाणे या मार्गावर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सकाळी ७.०० ते सकाळी ८.०० या वेळेत "ठाणे - कार फ्रि रॅली सायकल टू वर्क " हिरानंदानी मेडोस येथे आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच ठाणे - वूमन नाईट सायकलिंग संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत कॅडबरी जंक्शन ते उपवन लेक या मार्गावर आयोजित करण्यात आली आहे.
तसेच दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० या वेळेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात "ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन"चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ६.३० ते सकाळी ८.०० या वेळेत ' ठाणे जुनिअर चॅम्प" विहंग वॅली येथे तर सकाळी ६.३० ते सकाळी ८.०० या वेळेत " ठाणे - फ्रिडम सायकल रिपेअर क्लिनिक आणि हेरिटेज सायक्लोथॉन" शहरातील तलावपाळी, कोपिनेश्वर मंदिर, सेंट जॉन व मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) तथा ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या