Top Post Ad

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

 ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील रिव्हरवूड पार्क मेन गेट व रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये अनधिकृत शेड तोडून ०३ टपऱ्या, ०३ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकुम कशेळी रोडवरील हातगाड्यावर कारवाई करून १७ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.    नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हॉटेल,गावदेवी तीन हात नाका, राममारुती रोड तलावपाळी, स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी  नाका कोर्ट नाका येथील फेरीवाले हटवून सामान जप्त करण्यात आले. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमधील वर्तकनगर नाका, रामचंद्र नगर, काजुवाडी या परिसरातील हातगाडी, फेरीवाले हटविण्यात आले.

    उथळसर प्रभाग समितीमधील फ्लॉव्हर व्हॅली, सर्व्हिस रोड, नारळीपाडा, पाचपाखाडी येथील पदपथांवरील ०३ टपरी हटवून सामान जप्त करण्यात आले.  वागळे प्रभाग समितीमधील किसन नगर येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून १३ हातगाडया, ४ लाकडी बाकडे, २ टपरी, ०१, वजन काटा ०१, शेगडी ०१ सामान जप्त करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर,अलका खैरे, महेश आहेर आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com