Top Post Ad

असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी

 मेरा भारत महान या देशात कष्टकरी कामगारंची जिवंत पाणी नोंदणी होत नाही.अपघातात मृत्यू मुखी पडल्यावर सर्व यंत्रणा खळबळून जाग्या होतात.नोंदणीकृत कामगार का वापरले नाही याकरिता आज पर्यंत कोणत्याही ठेकेदारावर गंभीर गुन्हा दाखल झाला नाही.किंवा त्याला कडक शिक्षा झाल्याची नोंद नाही.देशात केंद्र सरकारच्या म्हणण्या नुसार ९३ टक्के असंघटीत कामगार आहेत.त्यांची कुठे ही अधिकृतरित्या नोंदणी होत नाही.त्यासाठी आताच्या मोदी सरकारने असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी करण्याचा निर्णय घेतला व त्याचे उद्घाटन २६ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले. सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे.

  त्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट २०२१ पासून त्याची अंमलबजावणी देशातील असंघटित कामगार नोंदणीचा "महामहोत्सव" सुरु झाला आहे.त्यामुळे देशातील ९३ टक्के असंघटीत कष्टकरी कामगार मजुरांची नांव नोदणी होईल पण त्यामुळे नियमितपणे काम मिळेल काय?. शासकीय ठेकेदार,किंवा खाजगी ठेकेदार या असंघटीत कामगारांना नियमितपणे रोजगार देऊन किमान वेतन देतील काय?.हा मोठा प्रश्न आहे.९३ टक्के कामगार असंघटीत कामगार असल्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही.ज्यादिवशी तो संघटीत झाला तर तो शासनकर्ती जमात बनेल हे मात्र शंभर टक्के सत्य आहे.इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६,THE BUILDING AND OTHER CONSTRUCTION WORKERS’ (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE) ACT,1961.बिल मजूर झाले.त्याची अंमलबजावणी २००८ पर्यत सुरु झाली नव्हती.त्या करिता अनेक संघटनेनी संघर्ष केला आहे.आता देशभरात त्याची अंमलबजावणी होत आहे.परंतु खरे असंघटीत इमारत बांधकाम कामगार ९० दिवसाचे प्रमाण पत्र सदर करण्यास असमर्थ ठरत आहेत.आणि बोगस कामगारांची नांव नोंदणी बिनबोबट होत आहे. 

असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी अशीच होणार असेल तर?. लाभार्थी कोण असतील त्यासाठी असंघटीत कामगार संघटीत होतील काय ?.
असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी 
लहान आणि अल्पभूधारक सीमांत शेतकरी / शेतमजूर,पशुपालन करणारे गुराखी मजूर, ) विडी कामगार,पाने गोळा करून विडी बनविणारे मजूर, ) इमारत बांधकाम कामगार,व बांधकामाशी सबंधित इतर कामगार म्हणजे रेती,वीट,दगड,माती,सिमेंट,परांची बांधणारे मजूर,प्लम्बर,सुतार,कारपेंटर, सेंटीग फिटर,एकूण ९४ प्रकारचे असंघटीत कामगार.  ) सेंट्रिंग कामगारलेदर कामगार, ७सुतार फर्निचर वाले कामगार,  ) वीटभट्टीवर काम करणारे.) सलून ब्युटीपार्लर कामगार नाभिक किंवा न्हावी. १०) घरगुती कामगार,घरेलू कामगार म्हणजे भाडी,कपडे धुणारे,लाधीपुच्छा करणारे,जेवण बनविणारे,११भाजीपाला विक्रेते,फेरीवाले,हातगाडी वाले.१२फळ विक्रेते,१३ ) वृत्तपत्र विक्रेते.१४ ) हातगाडी ओढणारे,हमाली करणारे.१५ )ऑटो रिक्षा चालक,मालक,१६ ) घरकाम करणारे कामगार म्हणजे दळण,भाजीपाला,मुले सांभाळणारे.१७ ) आशा कामगार, १८ ) दूध उत्पादक छोटे शेतकरी,19 ) सामान्य सेवादेणारे केंद्रचालक20 ) स्थलांतरित कामगार.पार राज्यातुन आलेले प्रवाशी कामगार.अशा ९३ टक्के असंघटीत कामगार त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही 

म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे  श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे.ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक कल्याणकारी अनेक योजनेचा लाभ या असंघटीत कामगारांना मिळण्यास सोपे होणार आहे.असे मोदी सरकारचे म्हणणे आहे.केंद्राच्या उत्पन्न देणाऱ्या चांगल्या कंपन्या मोदी सरकार विकत असतांना त्या क्षेत्रातील संघटीत कामगारांना असंघटीत करण्याचे धोरण राबवीत असतांना खरेचं असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी लाभ देणारी असेल काय?. सरकारी नोकरी भारती बंद,सरकारी कंपन्याचे खाजगीकरण भांडवलदारांना मोकळे रान न्याय हक्क अधिकार देणारे सर्व कामगार कायदे रद्ध मग असंघटीत कामगारांना खरच न्याय सन्मान मिळणार काय?. असे प्रश्न उपस्थित होत असतांनाच असंघटीत कामगारांनी भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी संघटीतपणे नांव नोदणी करून घ्यावी.कारण लक्ष असंघटीत कामगारांच्या संख्येकडे असेल.

असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी झाल्यावर मिळणाऱ्या योजनेचे फायदे 1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात (खाजगी ठेकेदार भांडवलदारांना ) त्यांनाच होईल. 4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. 

म्हणजेच गांभियाने विचार करा ९३ टक्के असंघटीत कामगारंचे अच्छे दिन आनेवाले है.
असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी करण्यासाठी इ श्रम नोंदणी निकष काय ?.
 ) ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी.२ ) ती व्यक्ती इन्कमटॅक्स भरणारी नसावी.
 ) ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी. ४ ) वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी. इ श्रम नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे.आधार कार्ड,मोबाइल नंबरबँक पासबुक,शैक्षणिक माहिती (वैकल्पिक )  ) उत्पन्न दाखला (वैकल्पिक) हे कागदपत्र घेऊन सेतू सुविधा केंद्र/ सेवा सर्व्हिस केंद्र यांच्याकडे नांव नोंदणी करता येईल.असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी eshram.gov.in वर सुद्धा करता येईल किंवा visit https://findmycsc.nic.in साईटवर भेट द्यावी.eshram-care@gov.in या इमेल वर पाठवू शकतात.असंघटित कामगारांची ई श्रम कार्ड महानोंदणी असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणारी ठरावी ही अपेक्षा आहे. असंघटीत कामगारांनी संघटीत होऊन या योजनाचा लाभ घ्यावा.

सागर रामभाऊ तायडे.
९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com