बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यात संवाद यात्रेचे आयोजन

 पक्ष संघटना मजबूत करण्याच्या व पक्षाचा विस्तार, प्रचार, प्रसार करण्याच्या दृष्टीकोणातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.त्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी रायगड जिल्हाच्या वतीने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य व स्फुर्ती निर्माण करण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवा आश्रम हॉल ,खांदा कॉलनी, न्यू पनवेल, जिल्हा रायगड येथे भरलेल्या ह्या संवाद यात्रेत उपस्थित असलेले  प्रमुख मार्गदर्शक रामजी गौतम  राज्यसभा खासदार  तथा प्रभारी महाराष्ट्र, प्रमोदजी रैना प्रदेश प्रभारी महाराष्ट्र, अॕड. संदिप ताजणे प्रदेश प्रभारी महाराष्ट्र यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधला.पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध परिसरातील समस्यांचाही आढावा घेतला.यावेळी नरेश कोळी-बहुजन समाज पार्टी महासचिव उरण विधानसभा व उरण शहर अध्यक्ष सलीम शेख यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

    नरेश कोळी हे नेहमीच उरण तालुक्यातील सामाजिक कार्यात मोठा हातभार लावत असून गरजू लोकांना मदत  करत आहेत. हॉस्पिटलमध्ये कार्यरत आसल्याने रुग्णांची सेवा उत्तम प्रकारे त्यांनी केली आहे.जे एन पी टी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवून त्यांना नोकर भरतीत प्राधान्य मिळवून देण्याची कामे ते करत आहेत अशा प्रकारे  समाजात उत्तम प्रकारची चांगली कामे केल्याने हा गौरव सत्कार केला आहे.पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असे अभिमानास्पद काम करत आहेत निश्चितच पक्षासाठी हि अभिमानाची बाब आहे असे रामजी गौतम यांनी मत व्यक्त केले .

यावेळी पक्षाचे काम करणाऱ्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला.यावेळी फुलचंद किटके -जिल्हाध्यक्ष,अनिल नागदेवे -जिल्हा प्रभारी,सुरेंद्र पालकर -जिल्हा प्रभारी,सुनील गायकवाड -जिल्हा प्रभारी,रामदास शिंदे -उपाध्यक्ष,गणेश उके -कोषाध्यक्ष,सिद्धार्थ मोरे -संघटन मंत्री,केशव साळवी -सचिव आदी रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या व पक्षाचा विस्तार, प्रचार, प्रसार करण्याच्या दृष्टीकोणातून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. ठाणे जिल्हाच्या वतीने  देखील या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या एन.के.टी.ई शाळेच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या