Top Post Ad

डॉ. बाबासाहेबांनी घेतलेली वडगाव आणि तळेगाव येथील जागा.....

    सनातनी पुण्यात नालंदा विद्यापीठा सारखे सुसज्ज अभ्यास संकुल आणि वसतिगृह उभारावे अशी डॉ बाबासाहेबांची इच्छा होती परंतु बाबासाहेबांचे हे स्वप्न देखील त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांप्रमाणे उध्वस्त होईल असे दिसते. बाबासाहेबांनी यासाठी पुण्यात तळेगाव येथे जमीन आणि एक बंगला सुद्धा विकत घेऊन ठेवला होता, पुढे कामाच्या वाढत्या व्याप्तीमध्ये या जागेकडे बाबसाहेब लक्ष देऊ शकले नाही. इतिहासकार प्रभाकर ओव्हाळ यांच्या संदर्भानुसार बाबासाहेबांनी संत गाडगे महाराज आणि लेखक प्र.के.अत्रे यांच्या सोबत एक बैठक याच जागेत घेतली होती आणि आपला अशा पद्धतीचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला तसेच यावर आपण एकत्र काम करूया असे सुद्धा ठरण्यात आले होते.

बाबासाहेबांनी हर्नेश्वर टेकडी येथे ६५ एकर जागा १६००० रुपयात विकत सुद्धा घेतली होती, पुढे त्यांनी २२ एकर जागा वडगाव येथे विकत घेतली होती असा संदर्भ इतिहासकार ओव्हाळ यांच्या कडे आहे. ओव्हाळ यांचे या विषयावरील पुस्तक  (२०१५)   प्रकाशित आहे. नालंदा आणि तक्षशीला या प्राचीन विद्या संकुलांतील शिक्षण पद्धती आणि प्रशासनाचा अभ्यास बाबासाहेबांचा होता, या दोन्ही विद्यापीठांवर प्रभावित होऊन बाबासाहेबांनी हि संकल्पना पुन्हा रुजवण्यासाठी पुणे येथील वडगाव आणि तळेगाव येथे ८७ एकर जमीन विकत घेऊन ठेवली होती, त्यात त्यांचा एक टुमदार बंगला सुद्धा आहे आणि असे असूनही "विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती" स्मारकाला जागा नाही मिळत म्हणून भटकत आहेत.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पोलिटिकल सायन्स चे मुख्य आणि वाइस प्रिन्सिपल मान.प्राध्यापक प्रकाश पवार यांनी माध्यमांना सांगितले कि १९४८ मध्ये बाबासाहेबांनी अशा पद्धतीच्या विद्यापीठासाठी जमीन मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले आणि तसे पत्र त्यांनी ६ जानेवारी १९४९ साली पुणे कलेक्टरांना पाठविले होते. बाबासाहेब त्या पत्रात इंदुरी तळेगाव येथील "दाभाडे किल्ला" विकत हवा असल्याची इच्छा व्यक्त करतात परंतु पुढे त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नाही, बाबासाहेब अजून काही काळ जगले असते तर मिलिंद विद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालायासोबत भव्य असे विद्यापीठ या महाराष्ट्रात उभे राहिले असते. ज्या ७ गुंठे जमिनीवर बाबासाहेबांचा बंगला आहे ती जमीन हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे स्मारक समितीचे अध्यक्ष आणि तळेगाव महानगरपालिकेचे माजी अध्यक्ष रंजना भोसले यांनी नमूद केले.

बाबासाहेबांच्या बंगल्याच्या आजूबाजूला इतर अनेक लोकांचे प्लॉट आहेत त्यांनी जर ती जागा देऊन बाजूच्या खुल्या जागेत गेले तर प्रशस्त स्मारक आम्ही बनवू शकतो असंही त्या म्हणाल्या. संबंधित ७ गुंठे जमीन हि शहा अल्टीनो वसाहतीत आहे आणि बाबासाहेबांचा बंगला प्लॉट नंबर ३५ वर आहे.स्मारक समिती प्लॉट नो २८ ते ३४, ३६ आणि ४५ मिळून एकूण ५२ गुंठे जमिनीची मागणी करत आहेत समितीचे सचीव मान. किसान थूल यांच्या मते बाबासाहेबांनी एकूण ६५ एकर जमीन ३६ नोवेंबर १९४८ साली खरेदी केली जी त्यांच्या मृत्यू नंतर २९ जानेवारी १९५९ साली त्यांचे पुत्र यशवंतराव आणि पत्नी सावित्रीबाई यांच्याकडे हि जमीन हस्तांतरित झाली. पुढे हि जमीन २४ नोवेंबर १९५९ साली ADMINISTOR GENERAL OF MUMBAI कडे हस्तांतरित झाली. बाबासाहेबांचा बंगला असलेला प्लॉट Joseph Vincent De Souza या व्यक्तीने १ एप्रिल १९६७ साली विकत घेतली आहे.

बाबासाहेबांचे नातू मान. प्रकाश आंबेडकर यांच्याशी पुणे मिरर ने संपर्क केला असता या विषयावर मला काही बोलायचे नाही असे सांगून बाळासाहेबांनी विषय टाळला.

माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशाने कॉलेज किंवा वसतिगृहांसाठी तसेच संस्थांसाठी जमिनी खरेदी केल्या होत्या त्यांचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे.

अमोल गायकवाड





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com