SRA कार्यालय बांद्रा मुंबईवर जनआक्रोश महामोर्चा

SRA कार्यालय बांद्रा मुंबई दि.17/8/21,वेळ दु.2. वा. जनआक्रोश महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे,

    मुंबई- स्वयंघोषित फेडरेशन, रुपारेल बिल्डर व आपल्यातील 39 पैकी 34 दलाल घरधारक (5 जणांनी आपली फसवणूक झाल्याचे मान्य करून आपल्याकडे 100/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ऑफीडेव्हिड लिहून दिले आहे.) तसेच दिपक निकाळजे, प्रकाश जोशी, कार्तिक भट हे लुटारू विकासक यांच्यात संगनमताने झालेल्या समजोता कराराला सिद्धार्थ कॉलनी घरहक्क संघर्ष समितीने हायकोर्टात आव्हान देताच रुपारेल बिल्डरने घाई घाईत SRA तील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून LOI ( आशय पत्र ) अखेर मिळवला. आता त्या LOI ला (आशय पत्राला )SRA च्या कोर्टात आव्हान देण्यासाठी संघर्ष समितीने तयारी केली आहे.

सिद्धार्थ कॉलनी ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून बाबासाहेबांच्या पुण्याईनेच ती आम्हाला मिळालेली आहे. एकूण 16 एकरवर वसलेली आपली सिद्धार्थ कॉलनी आता 3 एकर मध्ये सीमित होणार आहे. असा प्लान रुपारेल बिल्डरने SRA मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये 21 मजली 4 इमारती व 14/16 मजली 4 इमारती स्मशानाच्या बाजूला,780 sm ची तीन मजली इमारत त्यामध्ये बुद्ध विहार,व्यायाम शाळा व वाचनालय दिले आहे,ते ही स्मशानभूमीच्या बाजूला.इमारतीची रचना पाहिल्यास असे दिसते की आडव्या झोपडपट्टीला उभी बनवली आहे.ज्या गाथा बुद्ध विहारात बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत ते बुद्ध विहार रुपारेल बिल्डरने स्मशानाच्या बाजूला देऊन आमच्या स्वाभिमानाला व अस्मितेला ठेच पोहचवली आहे.

 घरधारक SRA योजनेमध्ये विकासक झोपडीधारक निवडत असतात कारण तो त्यांना शासनाने दिलेला अधिकार आहे. परंतु इथे मात्र विकासक हायकोर्टाच्या माध्यमातून आपल्यालावर बेकायदेशीरपणे लादण्याचे काम SRA ने केले आहे.त्यामुळे SRA तील भ्रष्ट कारभाराविरोधात खालील मागण्यांसाठी 17 ऑगस्ट  रोजी दु.2 वाजता SRA कार्यालय बांद्रा येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 घरधारकांच्या बहुमताने विकासक निवडण्यासंदर्भातील सन- 2011 ची हाय पॉवर कमिटीच्या आदेशाची  अंमलबजावणी ताबडतोब करा.   शासनाचा क्लस्टर सर्वे ताबडतोब करा.   SRA चे सर्व नियम धाब्यावर बसवून रुपारेल बिल्डरला दिलेला LOI ताबडतोब रद्द करा.  स्वयंघोषित सिद्धार्थ कॉलनी विकास सेवा संघ(नियो.) हौसिंग फेडरेशन रद्द करा. या प्रमुख मागण्या मान्य करून घेण्यासाठी जनआक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हा  स्वयंघोषित फेडरेशन,रुपारेल बिल्डर हटाव, सिद्धार्थ कोलनी बचाव,यासाठी सर्व सिद्धार्थ कॉलनीतील घरमालक एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढाई लढू या असे आवाहन असे आवाहन सिद्धार्थ कॉलनी घरहक्क संघर्ष समितीने केले असल्याची माहिती राजू कदम (97688 33811) यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA