ठाणे, मीरारोड, कल्याण विरार परिसरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी दसऱ्याला

  मुंबई:  म्हाडाद्वारे  सुमारे ९ हजार  सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोना  महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेली  म्हाडाच्या  घरांची लॉटरी दसऱ्याला काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  या लॉटरीद्वारे एकूण ९ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लॉटरीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी ६५०० घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी २००० घरे आणि २० टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या ५०० घरांचा समावेश आहे. या एकूण ९ हजार घरे निम्न आणि मध्य वर्गीयांसाठी असणार आहेत. ही घरे ठाणे, मीरारोड, वर्तकनगर, कल्याण, वडवली, गोथेघर आणि विरार बोळिंज नाका येथे उपलब्ध होत आहेत. मीरारोड येथे मध्यम वर्गीयांसाठी २ बीएचकेची १९६ घरे उपलब्ध होत आहेत. तसेच ठाण्यातील वर्तकनगरमध्ये ६७ दुकानेही उपलब्ध होत आहेत. 

कोकण मंडळाच्या लॉटरीद्वारे, ठाण्यातील वर्तकनगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी ६७ घरे उपलब्घ असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ ३२० चौरस फूट इतके असणार आहे. वडवली येथे २९, कासारवडवली येथे ३५० घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होत आहेत. या घरांची किंमत १६ लाखांच्या आसपास असणार आहे. विरार येथे १ हजार ३०० घरे उपलब्ध होत आहेत. यातील एक हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत, तर उर्वरित घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. वडवली येथे 20, कासारवडवली 350 घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून, या घरांची किंमत 16 लाखांच्या जवळपास राहणार आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे असणार असून, या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट आहे. या घराची किंमत 38 ते 40 लाखांच्या आसपास असेल. विरार येथे 1 हजार 300 घरे उपलब्ध असतील. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA