कळवा मधील टाकोली मोहल्ला जॅम फॅक्टरी, खारेगाव येथील बांधकामांवर कारवाई


ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील ६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.  या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील जॅम फॅक्टरी, खारेगाव येथील स्टील्ट अधिक ६ मजली अनधिकृत इमारत तसेच जामा मशिद, कळवा नाका येथील तळ अधिक ४ मजली अनधिकृत इमारतीवर  निष्कासनाची कारवाई करण्यात आली. हिरादेवी मंदिर, खारेगाव येथील स्टील्ट अधिक ५ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून ०७ रूमच्या भिंती तोडण्यात आल्या. यासोबतच  मच्छी मार्केट जवळील राज वाईन्सच्या पाठीमागे ओम मयुरेश सोसायटीची स्टील्ट अधिक ८ मजली अनधिकृत इमारतीच्या १४ रुमच्या भिंती तोडण्यात आल्या. तसेच टाकोली मोहल्ला येथील तळ अधिक ९ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान दिवा येथे बांधण्यात आलेल्या २ चाळीमधील अनधिकृत खोल्या तोडण्यात आल्या.

सदर निष्कासनाची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये  अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त फारुख शेख, प्रणाली घोंगे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1