बाळकूम गाव येथील तळ मजला व्याप्त असलेल्या दोन मजल्याचे कॉलम तोडण्यात आले. वाघबीळ गाव येथील स्टील्ट अधिक पाच मजली अनधिकृत इमारतीवरील पाचव्या मजल्याचे सेन्ट्रीगचे स्टील गॅस कटरने कट करण्यात आले असून दोन मजल्याचे मालदा साफ करण्याचे काम सुरू आहे. तसेच कोळीवाडा, कासारवडवली येथील स्टील्ट अधिक पाच मजली इमारतीतील मालदा उचलण्याचे काम सुरू आहे.
सदर निष्कासनाची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. कार्यकारी अभियंता रामदास शिंदे, उथळसर प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
0 टिप्पण्या