( प्रजासत्ताक जनता) - शहापूर तहसील कार्यालयवर ९ ऑगस्ट जागतीक आदीवासी दिन आणि क्रांतीदिनी मार्कसवादी कम्युनिस्ट पार्टी शहापुर तालुका कमिटीच्या नेत्रुत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या अग्रभागी "आदीवासी अधिकार राष्ट्रीय मंच " चा बँनरवर जागतिक आदीवासी दिनाच्या शुभेच्छांचा बँनर होता .र ९ आँगस्ट जागतिक आदीवासी दिवस असतांना आनंदोत्सव साजरा न करता आज तालुक्यातील अडीज हजार पेक्षा जास्त आदीवासी व बिगरआदीवासी बांधव शेतकरी, कामगार, विद्यार्थी ,महीला हे वाढती महागाई, पेट्रोल डिझेलची भरमसाठ भाववाढ, गँसदरवाढ, वाढती बेकारी या मुद्यावर आंदोलनकर्ते लोकांनी आपल्या मागण्यांसाठी तब्बल ४ तास तहसिल प्रांगणात स्वतःला अटक करून घेतले. मोदी सरकारचा निषेध व्यक्त करून तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात सिटु, किसानसभा, जनवादी, डि. वाय. एफ. आय, एस. एफ. आय. या माकपाच्या सर्व जनसंघटनांचा सहभाग होता. ९ ऑगस्टचे 'मोदी हटाव! देश बचाव!' आंदोलनात उपस्थिती माकप तालुका सचिव कॉ.भरत वळंबा, किसान सभेचे तालुका सचिव कॉ. कृष्णा भावर, DYFI तालुका अध्यक्ष कॉ. सुनील करपट, SFI जिल्हा सचिव कॉ.भास्कर म्हसे, सिटू तालुका अध्यक्ष कॉ.विजय विशे, जमस तालुका अध्यक्ष कॉ.सुनीता ओझरे, कॉ. नंदू खांजोडे, कॉ.अशोक विशे, कॉ.कमल वळंबा आदि कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले. - वन अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन जमीन कसनाऱ्यांच्या नावे करा.
- तालुक्यामधील पेसा गावांना गावठाण मंजुर करून ते उपलब्ध करून द्या.
- तालुक्यातील ताणसा, भातसा, वैतरणा, मध्यवैतरणा धरणाचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी द्या
- तालुक्यातील कारखान्यात ऊद्योगात स्थानिक युवक युवतींना 80% या प्रमाणात कायम स्वरूपी रोजगारात प्राधान्य मिळालेच पाहीजे.
- कोरोना कालातीत सर्व विजबिल माफ करा
- बेलनाला ते दहिगाव रस्ता झालाच पाहिजे.
- ठाणे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील रिक्त पदे स्थानिकातुन भरा.
- शेतकरी विरोध तीन कृषी कायदे त्वरित मागे घ्या.
- आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वैयक्तीक खर्चासाठी डि.बी.टी त्वरित जमा करा 10)तालूक्याती सिटु प्रणित कंपन्यामधील कामगार वर्गाचे रखडलेले पगारवाढीचे प्रस्ताव मार्गी लावा.
- बंद पडलेले उद्योग सुरू करुन करुन कामगारांना कामावर रुजू करा
- तालुक्यातील कोटी विद्या ट्रस्टची चौकशी करून भरमसाठ फि आकारून विद्यार्थी वर्गाची लुट करणारे ट्रस्टवर गुन्हे दाखल करा!..
- सापगाव शहापुर रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी बाधीत शेतकरी यांना भरपाई देवुन रखडलेले रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावा.
- अशा चोवीस देशव्यापी मागण्या व स्थानिक तेरा मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या
0 टिप्पण्या