
सर्व पध्दतीचे बाग-बगिछे, खुली मैदाने, क्रिंडागणे आदी चालण्यासाठी, फिरण्यासाठी आणि रनिंग, सायकलिंग, व्यायाम करण्यासाठी खुली ठेवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. सर्व खाजगी आणि शासकिय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान गर्दी होणार आणि अशा वेळेत ही सर्व कार्यालये सुरु ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याबाबतही सूचना जारी करण्यात आली आहेत. याशिवाय वर्क फ्रॉम पध्दतीने कामकाज सुरु ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभाग आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाने शाळा-कॉलेजसाठी जारी केलेले सर्व नियम यापुढेही लागू राहणार आहेत. तर सर्व प्रकारची रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार या कालावधीत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर फक्त पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली. या सवलती देतानाच रात्रो ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये कडक निर्वंध कायम राहणार आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन, राजकिय-सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूकीचा प्रचार, रॅली, निदर्शने गर्दी टाळून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करून यापैकी कोणतीही गोष्ट केल्यास संबधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सर्व कृषी कामे, सिव्हील वर्क, औद्योगिक कामे, मालाची ने-आण करण्याची कामे पूर्ण क्षमतेने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वातानुकुलीत नसलेली जिम, योगा सेंटर, कटींग सलुन, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेसह रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हि सर्व दुकाने कामाकाजाच्या दिवशी अर्थात सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास, शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स थिएटर मात्र यापुढेही बंद राहणार आहेत. याशिवाय राज्यातील सर्व देवस्थाने आणि मंदीरही यापुढेही कायम बंद राहणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यामध्ये निर्बंध कायम राहणार असून हे निर्बंध लेदल ३ मधील राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरमध्ये कोरोना बाघितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने या जिल्ह्यामधील निर्बंध जिल्हा आपतकालीन व्यवस्थेकडून आणखी कडक करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आपल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले.
0 टिप्पण्या