कंत्राटदारच भरतात सार्वजनिक बांधकाम'च्या मोजमाप पावत्या

माजी सचिवाने घोटाळा दडपल्याची तक्रार, 'बहुजन संग्राम' ची राज्यपालांकडे धाव

   मुंबई- राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले सी. पी. जोशी यांनी सुमारे 50 वरिष्ठ-कनिष्ठ अभियंत्याचा सहभाग असलेला एक मोठा घोटाळा दडपला आहे. इतकेच नव्हे तर त्या सर्व भ्रष्ट अभियंत्यांना क्लीन चीट मिळण्याची पळवाट मागे ठेऊन त्यांच्याशी इमान राखले आहे.  या प्रकरणाची हितसंबंधितांनी अडगळीत टाकलेली फाईल बाहेर काढून फेरचौकशीचे आदेश देण्यात यावेत. या मागणीसाठी 'बहुजन संग्राम' संघटनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यपालांना या संदर्भात एक निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

या घोटाळ्यात अँटी करप्शन ब्युरोने कलानगर वांद्रे येथील शासकीय अतिथीगृहातुन जप्त केलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 250 मोजमाप पुस्तिका नंतर कंत्राटदारांच्या कब्जात सापडल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात तत्कालीन मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी पन्नासपैकी फक्त 31 कनिष्ठ अभियंत्यांनाच दोषी असल्याचे दाखवले होते. त्यांनी याबाबतचा अहवाल तत्कालीन अप्पर मुख्य सचिवांना सादर केल्यानंतर त्या घोटाळेबाज अभियंत्यांपैकी फक्त 13 अभियंत्यांनाच निलंबित करण्यात आले होते. मात्र वर्षभरातच त्यातील 11 जण पुन्हा सेवेत रुजू झाले होते, अशी धक्कादायक माहिती बहुजन संग्रामने राज्यपालांना निवेदनातुन दिली आहे.

या घोटाळ्यात 20 अभियंत्यांना 'मोकाट' सोडून देणारे मुख्य अभियंता सी. पी. जोशी पुढे बढतीने सचिव बनले होते. तिथे त्यांनी हे प्रकरण गंभीर नाही असा शेरा मारून कोनाडयात टाकून दिले. त्यामुळे त्या भयंकर घोटाळ्यात गुंतलेल्या 'भ्रष्ट अभियंत्यांना क्लीन चीट मिळण्याचा मार्ग खुला झाला, असे भीमराव चिलगावकर यांनी म्हटले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्यातील कामांच्या 250 मोजमाप पुस्तिका कंत्राटदारांकडे सापडल्या होत्या. त्यावरून त्या पुस्तिकांमध्ये कामाच्या नोंदी कंत्राटदारच करतात, हे जगजाहीर झाले होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे अधिकारी झाले होते निलंबित एस. डब्लू. चव्हाण,  व्ही. जी. देशपांडे, व्ही. एच. अहिरे, डी. ए. पाटील, जी. एम. गावकर, एस. बी. सोनाणीस, जी. डी. डोंगळे, आर. बी. परदेशी, आर. एच. जगदाळे, ए.ई. पनाड, ए. एम. जाधव, व्ही. पी. पाटील, एस. बी. घरत. (त्यातील व्ही. एच. अहिरे व आर. बी. परदेशी हे दोघे निलंबनाच्या कारवाईआधीच निवृत्त झाले होते.) 

परंतु एस. डी. घाडगे, एस.टी. रायपूरे, ओ. ए. पाटील, डी. बी. मुळे, पी. व्ही. ठाकरे, एस. पी. सूर्यवंशी, एम.डी. बच्चेवार, एस. जे. शहाणे, एम. व्ही. मांजरेकर, एम. सी. शिकलगार, एस.डी. डावखर, जी. एस. कटके, पी. डी. धुंदूर, पी. व्ही. जाधव, व्ही. व्ही. कट्टी, एस. एस. चव्हाण, एस. एस. माने, ए. आर. घडले हे 'घोटाळेबाज' बचावले असल्याची माहिती  बहुजन संग्राम, महाराष्ट्र प्रदेश. प्रदेशाध्यक्ष  भीमराव चिलगावकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA