साकोली- देशात काँग्रेसने प्रदीर्घकळ लोकशाही टिकवून ठेवली मात्र 2014 नंतर केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे .देशातील परिस्थिती खराब आहे संविधानाला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे संविधान संपेल तर माणुसकी संपेल- लोकशाही संपेल काँग्रेसने संविधानाच्या आधारावर सत्तेचा उपयोग देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला मात्र आता केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देश विकायला काढले आहे. संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम असून काँग्रेसची विचारधारा राज्यातील जनसामान्यात पोहोचविण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेनी पाठविलेल्या तुमच्या लोकप्रतिनिधी वर सोपविली आहे म्हणून संपूर्ण राज्यभर दौरे सुरू आहेत. ही भविष्याची तयारी असून माझ्या क्षेत्रातील जनतेनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिक रित्या पार पाडत आहे मी क्षेत्रातील जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता वचनबद्ध आहे .
वर्ष 2012 ला बंद झालेली खावटी योजना ही कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी जंगल व्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाज बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये दोन हजार रुपये रोख कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत तर दोन हजार रुपयाची जीवनावश्यक वस्तूंची किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे राज्यातील जवळपास साडे बारा लक्ष आदिवासी कुटुंबीयांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे. पटोले पुढे म्हणाले की शासनाने मोहा फुलावरील बंदी हटवली असून त्यावर आधारित उद्योग निर्मिती करण्याची योजना राबवून जंगल व्याप्त परिसरातील महिलांना व युवकांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकृती वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी याकरीता शासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे.
याप्रसंगी कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे ,बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे ,तहसीलदार रमेश ठ कुंभरे, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेव किरसान ,संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष अशोक कापगते ,माजी सभापती रेखाताई वासनिक पिटेझरी चे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे ,मालू टोला चे सरपंच कृष्णा टेंभुर्णे ,उपसरपंच दिनेश कटरे, सुनिता कापगते, अंजिरा ताई चुटे ,छायाताई पटले, दामोदर नेवारे, लीलाधर पटले, इत्यादी मंचावर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी नीरज मोरे यांनी सांगितले की भंडारा जिल्ह्यातील 11700 आदिवासी कुटुंबीयांनी अर्ज भरले होते त्यापैकी 10, 384 कुटुंबीयांचे अर्ज वैध ठरले त्यांना मंजुरी देऊन सगळ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आली आहे .व जिल्ह्यातील पात्र आदिवासी कुटुंबीयांना खावटी किट वाटप करण्यात येत आहे. उरलेले अर्ज त्रुटी पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब या खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कमलेश सारवे यांनी तर आभार प्रदर्शन एस.टी .भुसारी यांनी केले कार्यक्रमात परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या