अरुणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, बेकायदेशीर घळभरणीची चौकशी झालीच पाहिजे, प्रकल्पात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही . प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या दे धडक बे धडक आक्रोश आंदोलनाची सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी दखल घेतली. आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन येत्या दोन आठवड्यात प्रकल्पावर मिटींग घेऊन प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे सदर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.
लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तीत्वाचा संघटणेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, सेक्रेकरी अजय नागप, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत, खजीनदार विलास कदम यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व समस्या मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांचे समोर प्रभावीपणे मांडल्या. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी येत्या दोन आठवड्यात अरुणा प्रकल्पस्थळी ज्या त्या विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक लावून प्रलंबित प्रश्न निकाली काढले जातील असे ठाम आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले .यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे उपस्थीत होते. आंदोलनात तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, विलास कदम, सुरेश आप्पा नागप, राजु नागप, हिरालाल गुरव, अशोक नागप, प्रसन्न नागप, अशोक सावंत, धोंडु नाना नागप, शांताराम नागप, विजय भालेकर. राजाराम नागप, अक्षय नागप, विनोद नागप, श्रीकांत बांद्रे, संतोष कांबळे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या