
कुर्ला ते माहीमची खाडी,बीकेसी,वांद्रे, खार,सांताक्रूझ पार्ला ,कुर्ला ते बैलबाजार साकीनाका हे मिठी नदीचे पात्र आहे. थोडा जरी पाऊस पडला तर इथल्या परिसरात लागलीच पाणी भरते. मोठा आणि मुळसळधार पाऊस पडला कि हाच पाऊस पुराचे रूप धारणा करतो शनिवारी रात्री सुरु झालेलया संततधार पावसाने मध्यरात्री थैमान घातले. बघता बघता हा परिसर पाणीमय झाला. घरात झोपलेली लहान मोठे, म्हतारे ,लहान मुलं बाळ सर्वांची दैना झाली. जरीमरी पवई,बैलबाजार, कुर्ला शीतल टोकीज ते संपूर्ण एअरपोर्ट विभाग, सांताक्रूझ एअर इंडिया कॉलनी, वाकोला कुर्ला मिठी नदी परिसर, वांद्रे बीकेसी,वांद्रे सरकारी वसाहत, कलानगर खार गोळीबार, खार रेल्वे स्थानक, खार सबवे,गोळीबार, जव्हार नगर, मराठा कॉलनी,हनुमान टेकडी, सांताक्रूझ रेल्वे स्थानक, हायवे, वाकोला पोलीस ठाणे ,आनंद नगर म्हाडा कॉलनी, कालिना विद्यापीठ वाकोला, जांभळी पाडा, शिवनगर, महंमद इस्टेट, शिवाजी नगर, डवरीनगर, गावदेवी, आग्रीपाडा, धोबीघाट, मिलन सबवे ते सांताक्रूझ एअरपोर्ट हा संपूर्ण मिठी नदी परिसर शनिवारी पाण्यात बुडाला. या कठीण प्रसंगी सोसायटीचे मंडळाचे कार्यकर्तेयांनी पीडित लोकांना मदतीचा हात पुढे केला.असे असले तरी अजूनहि लोकंमध्ये पावसाची दहशत आहे.
0 टिप्पण्या