Top Post Ad

शहरातील ४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

  ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.  या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील जीवदानी नगर वैभव ढाब्याच्या मागील तळ अधिक २ मजले व्याप्त असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील वाढीव बांधकामचे एकुण २१ आरसीसी कॉलम तोडण्यात आले.  तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती १, नौपाडा प्रभाग समिती १ आणि कळवा प्रभाग समितीमधील १ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलीत.

       सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर, डॉ.अनुराधा बाबर, शंकर पाटोळे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली. दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये रमेश रतन भगत यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com