क्रांतिकारी आंबेडकरी विचाराचा प्रशिक्षित कार्यकर्ता, नेत्याची गरज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ ला स्वतंत्र मजदूर युनियनची Independent Labour Union,(ILU).स्थापना केली, हे सर्व क्षेत्रातील संघटित असंघटीत कामगारांचे राष्ट्रीय फेडरेशन असेल.असी त्यांची संकल्पना होती,१९३४ ते १९३६ पर्यंत त्यांनी अतिशय दुर्लक्षित अज्ञानी,असंघटीत सफाई कामगार, दगड फोडणारे खाण कामगार, कोळसा खाणीत काम करणारे कामगार यांची खाणीत जाऊन पाहणी केली, मुंबईतील सफाई कामगार कर्मचारी यांची १९३७ साली म्युनिसिपल कामगार संघ ही ट्रेड युनियन स्थापन केली.


मुंबई ही भारताची औधोगिक आणि आर्थिक राजधानी आहे.म्युनिसिपल कामगार संघ मुंबईतुन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका मध्ये मागासवर्गीय समाजाची आंबेडकरी विचारधारा असणारी ट्रेंड युनियन असायला पाहिजे होती.देशभरातील सर्व महानगरपालिका,नगरपालिकेतील कामगार कर्मचारी हे आय एल यु चे सभासद होऊन आय एल यु हे देशव्यापी आंबेडकरी विचारधारेचे ट्रेंड युनियन महासंघ असता.पण तसा प्रयत्न झाला नाही असे म्हणता येत नाही,प्रयत्न झाला पण तो एक खांबी नेतृत्वात झाला.ज्या क्षेत्रातील जो तज्ञ असेल त्यांनीच त्याचे नेतृत्व केले पाहिजे.केवळ तज्ञ असुन चालत नाही,त्यात कुशल वक्तृत्व कौशल्य,संघटन कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आवश्यक असते.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या कोणत्याही संस्था,संघटना,पक्षात लोकशाही नुसार सभासद नोंदणी होऊन तिमाही, सहामाही, वार्षिक  बैठका होत नाहीत,  त्यांचे रीतसर रिकार्ड ठेऊन त्रिवार्षिक, पंचवार्षिक निवडणूका होत नाही.

एकच नेता धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व करतो,तोच नेता त्यांच्याशी प्रामाणिक,लाचारी पत्कारून चमचागिरी करीत असतो त्यालाच कार्यकर्ता पदसिद्ध पदाधिकारी बनतो.तो संस्था,संघटना आणि पक्ष वाढीसाठी काहीच करू शकत नाही,तो फक्त साहेबाला खुश ठेऊ शकतो.कुशल संघटक,कुशल वक्ता आणि कुशल नेतृत्व असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे प्रवेशद्वार बंद असते. कौशल्य, गुणवत्ता दाखवुन नेतृत्व मिळाल्यास संस्था, संघटना आणि पक्ष मोठे होतात.जिल्ह्यात राज्यात दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेता निर्माण होणार नाही यांची काळजी घेणारे नेते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संस्था, संघटना आणि पक्ष वाढविण्यासाठी असमर्थ ठरले म्हणून त्यांनी स्वतःच्या संस्था, संघटना आणि पक्ष काढून स्वतःच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष झाले.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय संस्था, संघटना आणि पक्षात लोकशाही मार्गाने सभासद होऊन काम करून निवडणूका घेण्यासाठी भाग पाडावे त्याकरिता निःपक्षपाती,निस्वार्थी,निर्भीड पणे विचारधारे वर प्रामाणिक पणे काम केल्यास सर्वच समाजाचा राज्याचा देशाचा विकास आणि कल्याण निश्चितच झाला असता. 


आम्हाला बाबासाहेबांचे शब्द कधीच आठवत नाही. बाबासाहेब म्हणतात मी जेवढी गरिबी अनुभवली असेल, तेवढी देशातील कोणत्याच नेत्याने अनुभवली नसेल, मी गरिब असून कधीही गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभीमान व माझे आंदोलन कमी होऊ दिले नाही, ऐवढी गरिबी असूनही मी कधीही पैशासाठी, पदासाठी विकलो गेलो नाही आणि तेच ध्येय प्रत्येक कामगार कर्मचारी यांनी डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास.सत्ता कोणाची ही असो प्रशासन आपलेच असेल.आणि आपल्या रक्ताच्या माणसासांठीच काम करेल. 
असा कामगार कर्मचारी आणि अधिकारी निर्माण झाला पाहिजे. हेच कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्गांचे ट्रेंड युनियन जाळे आर एस एस ने देशभर नव्हे जगभर निर्माण केले. 

आज ग्रामपंचायत ते सचिवालय पर्यंत त्यांचेच कामगार कर्मचारी अधिकारी कसे काम करतात त्यांचे अनेक उदाहरण दररोज वृतपत्रात नियमित वाचायला मिळतात. मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार करणारे आरोपी गावात,शहरात मोकाट फिरतात पोलिस अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ का असतात?. कारण कायद्या पेक्षा बाहेरील शक्ती मोठी असते.तिच्या दडपणाखाली कामगार,कर्मचारी,अधिकारीवर्ग काम करतो.म्हणुन त्यांचे स्वरक्षण करणारी यंत्रणा म्हणजे शासन प्रशासन असते.त्यांच्यावर ज्या विचारधारेच्या युनियनचे प्राबल्य आणि नेतृत्व असते.त्यांच्या दडपणाखाली हे सर्व प्रशासन काम करते.

मागासवर्गीय कामगार कर्मचारी विचाराने एकत्र आल्यास काय होऊ शकते त्यांचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार कर्मचारी संघटना. ही ३९ वर्षापूर्वी स्थापन झाली आहे, त्यांनीच देशव्यापी विद्युत फेडरेशन २००० ला बनविले.त्यांच्याच प्रयत्नाने स्वतंत्र मजदूर युनियन २००३ ला नव्याने स्थापना झाली.आज महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना सोबत घेवून स्वतंत्र मजदूर युनियन देशभरात बावीस राज्यात आणि सतरा क्षेत्रात आदरणीय जे एस पाटील यांच्या त्यागी कुशल नेतृत्वाखाली लक्षवेधी वाटचाल करीत आहे. 
आरक्षण पदोन्नती आणि नवीन भरती ह्यात मागासवर्गीय समाजाच्या कामगार कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या शिक्षणाकरिता १९५६ ला एक संस्था स्थापन केली होती. त्यात विषय ठेवले होते राजकारण, अर्थकारण,बजेट व कामगार क्षेत्र,यावरून बाबासाहेब कामगार क्षेत्राला किती महत्व देत होते हे कळून येते. आम्हाला जो इतिहास घडवावयाचा आहे तो सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन घडवावा लागेल. 

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही इंजिनियर रमेश रंगारी आणि जे एस पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती.या कर्मचारी संघटनेच्या आपल्या २२ पतसंस्था आहेत.स्वतंत्र मजदूर युनियनचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षक  असला पाहिजे.त्यांनी कामगार कर्मचारी यांना आय एल यु चे धेय्य धोरणे कार्यप्रणाली समजावून सांगितली पाहिजे. आज अनेक संघटनेचे कार्यकर्ते,वरिष्ठ इंजीनिअर व अधिकारी संघटनेचे कार्यकर्ते स्वताच्या संघटना युनियनचे ध्येय धोरणे समजून सांगण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच ते इंटक, आयटक, सिटू,भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्या पदवीधरांना स्वार्थासाठी ट्रेड युनियनच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. पदोन्नती मधील आरक्षणाचा गंभीर प्रश्न असतांना आजच्या घडीला अडीच तीन लाख कर्मचारी अधिकारी पदोन्नती आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटना युनियनचे सभासद व आर्थिक देणगीदार आहेत.त्या आर्थिक बळावर ते सर्वोच्य न्यायालयात दिवसाला पंचवीस लाख रुपये घेणारा वकील उभा करीत आहेत.त्यांच्या वकीला समोर आपल्या वकिलाना जास्त वेळ बोलण्याची संधी न्यायमूर्ती देत नाही.तिथे ही उच्चवर्णीय समाजाची विषमतावादी व्यवस्था योग्य त्या पद्धतीने काम करते.याची जाणीव बहुसंख्य आरक्षण लाभार्थी मागासवर्गीय कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना नाही.ते अजूनही वेगवेगळ्या संघटना युनियन मध्ये विभागलेले आहेत.काय फरक आहे विषमतावादी आणि समतावादी विचारांच्या ट्रेड युनियन मध्ये हे समजून घेणे आजच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक आहे.

कामगार कायदा १९२६ व सोसायटी कायदा १८६० जो सरकारी कर्मचारी अधिकारी यांना माहिती असला पाहिजे.कामगार क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या संघटना व त्यांची देशपातळीवरील सभासद संख्या आणि त्या संघटनेचे राजकिय स्वरूप. स्वतंत्र मजदूर युनियन व राष्ट्रीयपातळीवरील ट्रेड युनियन,संघटनेमधील फरक.
स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) शी संलग्न असलेल्या संघटित व असंघटित कामगार कर्मचारी संघटना आणि त्यांची सभासद संख्या.तिच्या वाढीसाठी उपाय योजना.  नगरपालिका व जिल्हापरिषद येथे असलेल्या संघटनेतील आपल्या कामगारांना क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या संघटनेचा पर्याय उपलब्द करून देण्यासाठी जनसंपर्क जनजागृती देण्यावर भर असला पाहिजे.असलेल्या संघटनांना आय.एल.यु शी संलग्न करून घेण्यासाठी वैचारिक प्रबोधन.असंघटित कामगारांच्या अडचणी व त्यावर उपाय. बाबासाहेबांचे कामगारापुढे दिलेले मनमाड व दिल्ली येथील भाषणाचे सार समजावून सांगून यातून जे कामगार कर्मचारी अधिकारी कार्यकर्ते म्हणून तयार होतील त्यांचे विभागीय पातळीवर एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर घेतल्या गेल्यास संघटनेकडे प्रशिक्षित कार्यकर्ता नेता नेतृत्व करण्यास सक्षम होईल.

उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी सेवा निवृत्तीनंतर काय करतात?.आर एस एस वर टिका करने सोपी आहे, पण त्यांच्या विचारांचा प्रशिक्षित वाहक तयार करून घरदार कुटुंब सोडून पूर्णवेळ समाजात काम करणारा स्वयंसेवक आपण पाहत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दलाची संकल्पना त्यांनी शंभर टक्के अमलात आणली. आपण मात्र चर्चाच करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन मान्यताप्राप्त करण्यासाठी आदरणीय जे.एस.पाटील निवृत्तीनंतर ही पायाला भिंगरी बधून देशभर संघटन बांधणीसाठी फिरत आहेत. लॉक डाऊन सारखी परिस्थिती असतांना ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मिटिंगा घेतल्या.शासन कर्ती जमात बनण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा होता. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यागी जिद्दी अभ्यासू कार्यकर्त्याची नेत्याची गरज होती.ती पूर्ण करण्याची जबाबदारी जे एस पाटील साहेब स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.देशातील सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास २०२२-२३ ला शंभर टक्के आपण यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच शासन करती जमात बनायचे असेल तर प्रशिक्षित कार्यकर्ता व नेताची आवश्यकता आहे.

सागर रामभाऊ तायडे   ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1