मातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

  वासिंद येथील  धम्मराजिक महाविहार  विपश्यना साधना केंद्रांत  नीम-स्वास्थ्य भव्य वृक्षारोपण आणि मातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  दिल्ली प्रदेशचे समाजकल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यात दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त विनयबोधि यांच्यासह  ज्येष्ठ विधितज्ञ तथा राजकीय विश्लेषक मा.डॉ.सुरेश माने, मारवाडी महासभेची सभापती लोकमित्र महेश्री, सिने अभिनेते गगन मालिक, उद्योगपती किशोर खत्री  तसेच सुरेश खेडेपाटील,  प्रमोद इंगळे, चंद्रभान आझाद, भास्कर वाघमारे, रविंद्र शिंदे, बाबा रामटेके,  विलास शंभरकर, बाबा भदरगे किशोर बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
 यावेळी अनेक नीम वृक्षारोपणही करण्यात आले, यामुळे ऑक्सिजन हब निर्मिती केली जाणार असल्याचे लोकमित्र महेश्री म्हणाले. प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांच्या सहयोगाने  प्रत्येक उपस्थित उपासक उपासिकांना  बुद्ध मूर्ती भेट देण्यात आली.


दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्ट च्या माध्यमातून कासने गाव येथील 4.5 एकर जागेमध्ये भदंत विनयबोधी महाथेरो यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविले जात आहेत, मागील 18 वर्षात येथील विहाराच्या प्रांगणात,Art गॅलरी,ध्यान सभागृह,सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय, गरजुंसाठी आपत्कालीन दवाखाना,औषधी वनस्पती व नीम नर्सरी,असे प्रकल्प राबविले जात आहेत, मुंबई ठाणे,नवी मुंबई आणि परिसरातील हालाखीत जीवन जगणाऱ्या वृद्ध माता पित्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आनंदी व चिंतामुक्त जीवन जगता यावे यासाठी भव्य वृद्धाश्रम उभारला जाणार असल्याचे प्रतिपादन भदन्त विनयबोधि यांनी यावेळी केले. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या