आचारगल्ली शिळफाटा येथील तळ +१ सह सहा बांधकामांवर पालिकेचा हातोडा

   ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून काल ६ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. दिवा प्रभाग समितीमधील फय्याज खान यांच्या आचारगल्ली शिळफाटा येथील तळ +१ व्याप्त असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील एकुण 32 आरसीसी कॉलम तोडण्यात आलेत. तर दोस्ती कॉम्प्लेक्सच्या मागील बाजुस खर्डी येथील आरीफ सुर्ति आणि भोलेनाथ नगरमधील रफाद खान यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती १, नौपाडा प्रभाग समिती १ आणि कळवा प्रभाग समितीमधील १ वाढीव अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली आहेत.


   दरम्यान  गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. या कारवाईतंर्गत अनेक बांधकामे निष्काषित करण्यात आली आहेत. जुने वाघबीळ गाव येथेही ताडपत्रीचे शेड असलेले अनधिकृत बांधकाम निष्काषित करण्यात आले होते.  या कारवाईमध्ये कुत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा खुलासा ठाणे महानगरपालिकेने केला आहे.  कुत्र्यांसाठी घर बांधण्यासाठीची कोणतीही परवानगी कोणीही घेतली नसून तशी परवानगी आणि जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यास ठाणे महानगरपालिका त्यास सकारात्मक प्रतिसाद देईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. सदरचे बांधकाम कुत्र्यांसाठी बांधण्यात आले होते अशा पद्धतीचे वृत्त पसरविण्यात आले परंतू कारवाईच्यावेळी त्या ठिकाणी तसे काहीच आढळून आले नसल्याचा खुलासाही महापालिकेने केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA