शिवराज्याभिषेक शिल्पचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला संभाजीराजे भोसले यांना आमंत्रित करण्याची मागणी

  ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक  शिल्पचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे भोसले यांना आमंत्रित करावे अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागावर शिवराज्याभिषेकाचे शिल्प बसविण्यात आले होते. परंतु हे शिल्प 25 वर्षे जुने असल्याने बहुतांशी जीर्ण झाले होते. मात्र आता काही दिवसांत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र आता ठाणेकरांना नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. 

हे शिल्पचित्र तयार करण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या शिल्पचित्राची पाहणी सखल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली. येत्या 15 दिवसांत महापालिकेच्या दर्शनी भागात हे चित्र झळकणार असून अत्यंत आकर्षक स्वरुपात भव्य दिव्य शिल्प साकारण्यात येत आहे. यामध्ये कोणाशी स्पर्धा करण्याचा हेतू नाही. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याची माहिती व्हावी या उदात्त हेतूने हे शिल्प बसविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात असे देखणे शिल्प साकारणारी ठाणे ही पहिलीच महापालिका ठरणार असून शिल्पचित्राच्या अनावरण खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या